205 ने 205 चा एकदा गाठला, शिवसेना शाखा क्रमांक 205 च्या वतीने रक्तदान शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तटंचाईच्या पाश्र्वभूमीवर केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना शाखा क्र. 205च्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात 205 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

कोरोनामुळे राज्यासह मुंबईत मोठ्या प्रमाणात रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. त्या पाश्र्वभूमीवर शाखा क्र. 205च्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्पूâर्त मिळाला. यावेळी रक्तदात्यांचा उत्साह वाढवण्यासाठी शिवसेना खासदार अरिंवद सावंत, शिवडीचे आमदार अजय चौधरी, शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी, महिला विधानसभा संघटक लता रहाटे, नगरसेवक सचिन पडवळ, नगरसेविका सिंधू मसूरकर यांनी भेट दिली. शाखाप्रमुख जयिंसह भोसले, शाखा समन्वयक कल्पना ओहळे, युवा शाखा अधिकारी ओमकार पोंगडे आणि असंख्य शिवसैनिकांच्या प्रयत्नामुळे हे शिबीर यशस्वी झाले. या शिबिराचे आयोजन शाखा 205चे नगरसेवक, स्थापत्य समिती अध्यक्ष दत्ता पोंगडे यांनी केले होते.