
सामना प्रतिनिधी। मुंबई
भारतीय तटरक्षक दल (कोस्ट गार्ड) अधिकाऱयाच्या पत्नीची फसवणूक करणाऱया दोघांना पवई पोलिसांनी अटक केली. रमणकुमार जयकिशन शर्मा आणि विकास हरिओम् शर्मा अशी या दोघांची नावे असून त्या दोघांनाही न्यायालयाने 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पवई येथे राहणाऱया तक्रारदार यांचे पती हे कोस्ट गार्डमध्ये आहेत. त्यांच्या पतीचा मित्र मिझोरम येथे राहतो. त्यांना एक सेकंड हॅण्ड स्कॉर्पिओ गाडी हवी होती. फेब्रुवारीमध्ये त्यांनी कल्याण येथील एका डीलरकडून सव्वातीन लाख रुपयांत स्कॉर्पिओ गाडी खरेदी केली. खरेदीनंतर कागदपत्रांची पूर्तता करून स्कॉर्पिओ मिझोरमला पाठवली जाणार होती. तक्रारदार हे मुंबईबाहेर असताना त्यांना सायबर भामटय़ाचा फोन आला. गाडी पाठवण्याकरिता प्रकिया करायची असून दोन माणसे पाठवली आहेत असे तक्रारदारांना सांगण्यात आले. तक्रारदारांनी त्याच्या परिचित असलेल्या व्यक्तीला गाडीची चावी दिली.गाडी पाठवण्याकरिता ऑनलाइन शुल्क बँकेत जमा करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदाराच्या पतीने 33 हजार 806 रुपये ऑनलाइन बँक खात्यात जमा केले. मार्च महिना उजाडला तरी गाडी न मिळाल्यामुळे मिझोरममधील व्यक्तीने तक्रारदारांना संपर्क साधला. फसवणूकप्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. परिमंडळ 10 चे उपायुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अनिल पोफळे यांच्या पथकातील अधिकाऱयाचे एक पथक तयार करण्यात आले. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे नवी मुंबईच्या कळंबोली येथून रमणकुमार आणि विकासला अटक करण्यात आली.




























































