मुरुड येथून मुलीस फूस लावून पळवले, 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यातील नायगाव येथील महाविद्यालयीन मुलीस मुरुड येथील महाविद्यालयातून फूस लावून पळवण्यात आले. या प्रकरणी 11 जणांविरुद्ध मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुरुड पोलीस ठाण्यात मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, त्यांची मुलगी मुरुड येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. दररोज ती गावाकडून बसने मुरुडला येत असे आणि कॉलेज करून परत बसने गावी येत होती. सकाळी 8 वाजता कॉलेजला जाते म्हणून घरुन गेलेली मुलगी घरी परत आली नाही. तिचा सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच सापडली नाही.

तिला लग्नाचे अमिष दाखवून इब्राहिम नूर शेख व त्याचे साथीदार नूर महंमद शेख, शमा नूर शेख, तुपीक नूर शेख, तयब बाबुराव शेख, महेब बाबूराव भालेकर, कैलास उद्धव माळी, कृष्णा बाबुराव भालेकर, मनोज बालाजी शिंदे, रेखा मनोज शिंदे, दादू चंदू शिंदे यांनी पळवून नेले. मुरुड पोलीस ठाण्यात या प्रकरणी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या