
एका मुस्लिम व्यक्ती तलाक न घेता कितीही लग्न करू शकते, परंतु मुस्लिम महिलेला हा हक्क नाही असा निर्णय पंजाब आणि हरयाणा कोर्टाने दिला आहे. न्यायमूर्ती अलका सरीन यांनी हा निर्णय दिला आहे असून Live Law या वेबसाईटने याबाबत वृत्त दिले आहे.
मुस्लिम महिलेने दुसरे लग्न करताना पहिल्या पतीपासून कायदेशीर घटस्फोट घेतला नव्हता. मुस्लिम व्यक्तीनेही पहिल्या पत्नीशी घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले होते. दोघांमध्ये प्रेमसंबध होते आणि 21 जानेवारी 2021 रोजी त्यांनी निकाह केला होते. यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी या निकाहला विरोध दर्शवला होता.
मुस्लिम पर्सनल लॉ नुसार व मुस्लिम विवाह कायदा 1939 नुसार महिलेला दुसरे लग्न करण्यासाठी पहिल्या पतीपासून घटस्फोट घेणे गरजेचे आहे. कोर्टाने म्हटले की, याचिकाकर्त्या महिलेने मुस्लिम विवाह कायद्यानुसार पहिल्या पतीशी घटस्फोट घेतला की नाही हे स्पष्ट झालेले नाही. तसेच कायद्यानुसार पत्नीचे पहिल्या पतीशी नातेसंबंध संपुष्टात आले की नाही हे देखील स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे याचिकाकर्ती महिला आणि तिचा पहिला नवरा दोघेही अजून पती पत्नी असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. या पार्श्वभूमीवर महिलेने केलेले दुसरे लग्न बेकायदेशीर ठरते असा निकाल कोर्टाने दिला आहे. तसेच जोपर्यंत महिलेच्या पहिल्या पतीशी घटस्फोट होत नाही तोपर्यंत या याचिकेवर सुनावणी करणे योग्य नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.



























































