
सामना प्रतिनिधी। नगर
खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील न्यायालयाने एका दोषीला सात वर्ष सक्तमजुरी व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. येथील जिल्हा न्यायाधिश एस.आर.नावंदर यांनी ही शिक्षा ठोठावली आहे. देवीदास शंकर काळे (48) असे त्याचे नाव आहे.
या घटनेतील फिर्यादी संगीता गायकवाड या माणिकदौडी येथील रहिवासी असून त्या वर्धमान आश्रमशाळेमध्ये स्वयंपाकीन म्हणून काम करत होत्या. या घटनेच्या वेळी देविदास यांच्या पत्नी याही या ठिकाणी स्वयंपाकीन म्हणून काम करत होत्या. नोकरीत नियमीत होण्यावरुन दोघींच्या कुटुंबात वाद होते. घटनेपूर्वी जसंपत गायकवाड याने देवीदास याच्या पत्नीचा शाळा सोडण्याचा दाखला माहितीच्या अधिकाराखाली मागवला होता. त्याचा राग आल्याने देविदासने गायकवाड यास जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. देविदास याने जसपंतवर कुर्हाडीने हल्ला केला हेाता. त्याच्या डोक्यावरही वार केले होते.
जसपंतवर खासगी रुगणालयात उपचार सुरु होते.येथील न्यायालयात या प्रकरणाचा खटला सुरु होता सरकार पक्षाच्या वतीने दहा साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने दोन्ही बाजुचा युक्तीवाद ऐकल्यानंतर ओरापी देवीदास काळे याला सात वर्ष सक्तमजुरी व 1 लाख रुपये दंडाची शिक्षा येथील जिल्हा न्यायाधिश एस.आर.नावंदर यांनी ठोठावली आहे.
सरकारीपक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले.































































