
नगर शहरात पुन्हा गुलमोहर रोडवरील किर्लोस्कर काॅलनीत दोन अज्ञातांनी बन्सी महाराज मिठाईवालाचे संचालक धीरज जोशी यांच्यावर शनिवारी (दि.10) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास खूनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जोशी हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी एक तलवार, गावठी पिस्तूल आढळून आले आहे.
जोशी हे या ठिकाणी जात असताना दोन जण आले व त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली व त्याच्यातूनच हा प्रकार घडला आहे झालेल्या झटापटीमध्ये या ठिकाणी अज्ञात हल्ल्या करणाऱ्याची पिस्तूल याठिकाणी पडलेले आहे असे तपासामध्ये पुढे आले आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. नगर शहरासह जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे. मागील घटना पाहता जिल्ह्यात खून, हापमर्डर यासह छोट्या मोठ्या गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आता पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांवर एन्काऊंटर चा प्रयोग करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
























































