नागपूर हादरले, स्फोटकांच्या कारखान्यात स्फोट; 9 ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरजवळील चाकडोह (बाजारगाव) येथील सोलार एक्सप्लोसिव्ह पंपनीत रविवारी सकाळी नऊ वाजता भीषण स्पह्ट झाला. या स्पह्टामध्ये नऊ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून सुदैवाने तीन कामगार बचावले आहेत. मृतांमध्ये सहा महिलांसह तीन पुरुषांचा समावेश आहे. या घटनेने संपूर्ण नागपूर हादरले असून बचावकार्यासाठी संपूर्ण यंत्रणा तैनात करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने पंपनीतील संवेदनशील परिसर रिकामा करण्यात आला आहे.

नागपूर-अमरावती महामार्गावर कोंढाळीपासून दहा किमी अंतरावर असलेली सोलार एक्सप्लोसिव्ह ही देशातील सर्वांत मोठी स्पह्टके बनविणारी पंपनी आहे. ही कंपनी हिंदुस्थानी संरक्षण दलाकरिता स्पह्टकांचे उत्पादन करते. सकाळच्या सुमारास सोलार एक्सप्लोसिव्ह पंपनीतील सीबीएच दोन या इमारतीत टीएनटी, आरडीएक्स, एचएमटी या स्पह्टकांच्या कॅपिंगचे काम सुरू असताना अचानक स्पह्ट झाला. मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्वे, मीता उईके, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मानापुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता उईके, मोसम पटले यांचा समावेश आहे.

पत्त्यांप्रमाणे इमारत कोसळली

स्फोट इतका भयावह होता की, सीबीएच क्रमांक दोन प्रकल्पाची संपूर्ण इमारत क्षणातच पत्त्यांप्रमाणे कोसळली. संजय आडे (51, राबाजारगाव) हा भीषण स्पह्ट झालेल्या इमारतीच्या बाजूच्या प्रकल्पात काम करीत होते. कंपनी सुपरवायझरच्या सांगण्यावरून ते या इमारतीतीमधील रिकामे पुठ्ठय़ांचे खोके बाहेर काढण्यासाठी गेले होते. खोके बाहेर ठेवून ते शंभर मीटर अंतरावर पोहोचले असतानाच हा भीषण स्पह्ट झाला. कामगार संजय आडे यांच्या डोळय़ादेखत ही इमारत पत्त्यांप्रमाणे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनेत संजय आडे बचावले आहेत.

पाच महिन्यांतील दुसरी घटना
यावर्षी ऑगस्टमध्येही या कंपनीला आग लागली होती. कचऱयाची विल्हेवाट लावताना झालेल्या स्पह्टात एका कामगाराचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला होता. या घटनेला पाच महिने लोटत नाही तोच रविवारी हा मोठा स्फोट झाल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एसआयटीमार्फत दुर्घटनेची चौकशी करा ः वडेट्टीवार
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी घटनास्थळ गाठत मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस केली. दरम्यान, पंपनी व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली आहे, असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सरकारने या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपयांची तातडीने मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

सरकारकडून पाच लाखांची मदत

राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे तसेच जखमींना वेळेत उपचार देण्याच्या सूचना केल्या आहेत. या कारखान्यात संरक्षणदृष्टय़ा महत्त्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने जिल्हा प्रशासन, पोलीस व संबंधित सर्व यंत्रणांना मदत व अनुषंगाने निर्देश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.

स्थानिक संतप्त, कंपनीवर अवाजवी कामाचा आरोप

सोलार पंपनीमधील अपघातांबाबत स्थानिकांमध्ये तीव्र संताप आहे. पंपनीने कर्मचाऱयांवर टाकलेल्या दबावामुळे ही दुर्घटना घडली आहे. असे अपघात यापूर्वी अनेकदा घडले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. येथील स्थानिकांना पंपनी कामावर घेत नाही. पंपनी इतर राज्यातील लोकांना दहा हजार पगार देऊन तासन्तास राबवून घेते. कामगारांना क्षमतेपेक्षा जास्त काम करावे लागल्यामुळे असे अपघात होतात, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

कंपनीकडून 20 लाखांची मदत
या दुर्घटनेत ठार झालेल्या कामगारांना नियमानुसार नुकसानभरपाई, मृताच्या कुटुंबातील एकाला नोकरी आणि निवृत्तीवेतनाचे लाभ दिले जातील, अशी माहिती कारखान्याचे संचालक व उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांनी दिली. याशिवाय मृताच्या वारसांना 20 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.