
कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने नागपूरमध्ये 15 मार्च ते 21 मार्च दरम्यान लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन नागपूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या क्षेत्रात राहील. या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व सेवा बंद राहतील. खासगी कार्यालयांनाही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लॉकडाऊन काळात शहरात नागरिकांच्या संचारावर कडक बंदी घालण्यात आली असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी ही घोषणा केली आहे.
































































