
जे क्रिकेटच्या इतिहासात आजवर घडलं नव्हतं, ते चिन्नास्वामी स्टेडियमवर आज घडलं. विजय हजारे करंडकासाठी खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात चेन्नई सुपरपिंग्जने करारमुक्त केलेल्या तामीळनाडूच्या सलामीवीर नारायण जगदीशनने साई सुदर्शनच्या साथीने अनेक विश्वविक्रम मोडीत काढीत क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते, हे जगाला दाखवून दिले.
हे विश्वविक्रम रचले
277 धावा (सर्वोच्च खेळी) – 2002 साली ऑलिस्टर ब्राऊनने सरेकडून खेळताना 268 धावांची खेळी केली होती. आज जगदीशनने 277 धावांचा विश्वविक्रम रचला
506/2 बाद (सर्वाधिक धावसंख्या) – इंग्लंडने याच वर्षी नेदरलॅण्डस् विरूद्ध 4 बाद 498 असा धावांचा एव्हरेस्ट उभारला होता. आज तामीळनाडूने 506 धावांचा नवा विश्वविक्रम केला.
435 धावा (सर्वोच्च विजय) – समरसेटने 413 धावा करत डेव्हनला 67 धावांत गुंडाळून 346 धावांचा सर्वात मोठा विजय नोंदविला होता. आज तामीळनाडूने 506 धावा करत 435 धावांनी सामना जिंकत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
























































