दिल्लीच्या नेहरू स्मारक संग्रहालय आणि ग्रंथालयाचे नाव मोदी सरकारने बदलले

केंद्र सरकारने नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीचे (NMML) चे नाव बदलून टाकले आहे. देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी हे नाव औपचारिकपण जाहीर करण्यात आले आहे. नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (NMML) चे नाव बदलून ते आता प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी सोसायटी करण्यात आल्याचे नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (NMML) च्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी सांगितले आहे. देशाच्या 77 व्या स्वातंत्र्यदिनी हे नाव औपचारिकपणे जाहीर करण्यात आले आहे. पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालयाच्या कार्यकारी मंडळाच्या उपाध्यक्षांनी पूर्वी ट्विटर नावाने ओळखल्या जात असलेल्या आणि आता ‘X’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोशळ मीडिया मंचावर र पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. “नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी (NMML) 14 ऑगस्टपासून पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (PMML) सोसायटी म्हणून ओळखले जाईल” असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.