
हवेतून प्रवास करण्यासाठी ‘नासा’ने खास एअर टॅक्सी डिझाईन केली आहे. एअर टॅक्सीची ट्रायल ‘नासा’ने सुरू केली आहे. ‘ईव्हीटीओएल’ असे या टॅक्सीचे नाव असून ती 2024 पर्यंत लाँच होऊ शकते. याचा वापर प्रवास करण्यासाठी आणि सामान वाहतुकीसाठी करण्यासाठी होईल. ‘नासा’ कॅलिफोर्नियामध्ये एअर टॅक्सीची चाचणी घेत आहे. सध्या जवळच्या शहरांमध्ये उड्डाण चाचणी सुरू आहे. याचा अहवाल आल्यानंतर भविष्यात एअर टॅक्सीचे मॉडेलिंग आणि सिम्युलेशनचे नियोजन करण्यास मदत होईल.
भविष्यात एअर टॅक्सी सेवांना मान्यता देण्यासाठी कोणते नियम लक्षात ठेवणे आवश्यक आहे हेदेखील चाचणीत समजू शकणार आहे. चाचणी यशस्वी झाली तर विमान उद्योगात मोठा बदल होईल, असे ‘नासा’च्या ऍडव्हान्स्ड एअर मोबिलिटी कॅम्पेनचे प्रमुख डेव्हिड हॅकेनबर्ग यांनी म्हटले आहे.
























































