आभाळमाया – सफल मंगळ यात्रेचे दशक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> वैश्विक

बरोबर महिन्यापूर्वी म्हणजे गेल्या 18 ऑक्टोबरला ‘नासा’कडून मंगळावर सतत दहा वर्षे भ्रमंती करून भरपूर वैज्ञानिक माहिती मिळवणाऱया ‘क्युरिऑसिटी’ संशोधक यानाची (प्रोब) सांगता करण्याचं ठरलं. ‘नासा’च्या ‘मार्स सायन्स लॅब’चा हा उपक्रम कमालीचा यशस्वी ठरला. एखादं खगोलीय अभियान भवितव्याचा वेध घेऊन कसं बनवावं याचं ‘क्युरिऑसिटी’ हे उत्तम उदाहरण. तब्बल नऊ महिन्यांनी पृथ्वीवरून पाठवलेली ही मंगळ-गाडी मंगळावर इच्छित स्थळी पोहोचली. मंगळावरच्या ‘गेल’ नावाच्या एका विवराचं निरीक्षण आणि विविधलक्षी प्रयोग करण्यासाठी ‘क्युरिऑसिटी’ 6 ऑगस्ट 2012 रोजी कार्यरत झालं. 5 कोटी 60 लाख किलोमीटरचा प्रवास करून मंगळावर पोहोचलेल्या या यानाने खूप काळ काम करावं अशी अपेक्षा सुरुवातीला नव्हती, परंतु ऊर्जास्रोत अबाधित राहिल्याने आणि त्यावरील उपकरणं त्यामुळे नीट काम करू शकल्याने ‘क्युरिऑसिटी’चा कार्यकाळ 2012 च्या डिसेंबरात दोन वर्षांनी वाढविण्यात आला.

6 ऑगस्ट 2017 रोजी ‘क्युरिऑसिटी’ कार्यरत झाल्याचा पाचवा वाढदिवस ‘नासा’ने उत्साहात साजरा केला. माणसाने दूरदृष्टीने विचार करून बनवलेल्या एका यानाची ती परग्रहावरची कमालीची यशस्वी कामगिरी होती. थोडं मागे जायचं तर 1997 पासूनच मंगळावर यान पाठवण्याचा आणि मंगळ-गाडीद्वारे मंगळपृष्ठावरील एखाद्या भागाचं सखोल संशोधन करण्याचा विचार सुरू झाला. चंद्र 1969 मध्ये पादाक्रांत झाला होता. मंगळावरही काही यानं आधी उतरली होती, परंतु विविक्षित कार्यक्रम ठरवून ‘क्युरिऑसिटी’ने काwशल्य दाखवायचं होतं. त्या यांत्रिक ‘प्रोब’मध्ये ते संशोधकांनी ठासून भरलं होतं.

बऱयाच विचारानंतर 2.9 मीटर लांब आणि 2.7 मीटर रुंदीची 174 किलो वजनाची ‘क्युरिऑसिटी’ गाडी आकाराला आली. ती बराच काळ चालण्यासाठी ‘रेडिओआयसोटोप’च्या ऊर्जेवरील (आरपीएस सिस्टमवर) चालणारी एक गाडी आकार घेऊ लागली. त्याला मिळणारी अव्याहत ऊर्जा प्लुटोनियम-238 च्या ‘आयसोटोप’पासून निर्माण होणार होती. त्यातून निर्माण होणारी उष्णता वाया न घालवता तिचेही पुन्हा ऊर्जेत रूपांतर करण्याचं तंत्र विकसित करण्यात यश आलं. ही विद्युतशक्ती या यानाला मंगळावरच्या सर्व ऋतूंमध्ये मिळू शकणार होती. त्यासाठी साडेचार किलो प्लुटोनियम-238 चा साठा त्यावर होता. तो ऊर्जेचा 14 वर्षे पुरवठा करू शकणार होता. त्यातून 110 वॉट इलेक्ट्रिकल आणि 2000 वॉट थर्मल पॉवरची निर्मिती होऊ लागली आणि योजना सफल झाली.
मंगळाची स्वतःभोवती फिरण्याची गती पृथ्वीपेक्षा जास्त असल्याने तिथला दिवस पृथ्वीच्या 20 तास 36 मिनिटे आणि 39 सेपंदांत पूर्ण होतो. मंगळाच्या दिवसाला ‘सोल’ (सोलार डे) म्हणतात. ‘क्युरिऑसिटी’ने मंगळावरचे 3623 दिवस भ्रमंती करून विविध प्रयोग केले.
त्यामध्ये मुख्यत्वे तिथे कधीकाळी ‘सजीव’ राहत होता का, त्यासाठीची पाणी-अन्नाची, हवामानाची अनुकूलता होती का या सर्व गोष्टींचा साद्यंत अभ्यास करण्याचा होता. कारण पूर्वी एच. जी. वेल्स यांच्या काल्पनिक कथेत मंगळावरच्या ‘लिटिल ग्रीन मेन’चं एवढं प्रभावी वर्णन केलं होतं की, चार अमेरिकन पिढय़ांना ते खरंच वाटत होतं. तीच गोष्ट पाण्याची. मंगळावरच्या ‘कनाली’ म्हणजे दऱया-डोंगरातल्या नैसर्गिक घळी पाहून त्याचा ‘पॅनॉल’ पिंवा कालवे असा अर्थ लावला गेला. तो खरा नव्हता, पण मंगळावर एकेकाळी पाणी असल्याचा तो पुरावा आहे, असं सतत म्हटलं जातं.
त्यानंतर मंगळावरचं गुरुत्वाकर्षण, हवामान, ऑरगॅनिक कार्बन, फॉस्फरस, सल्फर आणि इतर रासायनिक वैशिष्टय़ांची तपशीलवार माहिती पुढच्या मोहिमांसाठी ‘डेटा’ म्हणून आवश्यक होती. याशिवाय मंगळावरची लोहयुक्त माती, दगड यात काही सूक्ष्मजीव पिंवा जीवशास्त्रीय प्रक्रिया आढळते का याचाही तपास करण्याचा होता.

गेल्या चार अब्ज वर्षांत मंगळावरील वातावरणात कोणते बदल झाले? तिथलं सौर-प्रारण (सोलार रेडिएशन) किती? (अतिसूक्ष्म) या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवायची होती. ‘क्युरिऑसिटी’ने बराच काळ टिकाव धरून या सर्व प्रयोगांची पूर्तता केली.

हे सारं शक्य झालं ते बुद्धिमान माणसाच्या उत्सुकतेमधून. विराट विश्वाबद्दलची जाणीव, सातत्यपूर्ण उत्सुकता आणि जिज्ञासेतून माणसाला उत्तरोत्तर प्रगत वैज्ञानिक संशोधनाकडे घेऊन गेली. हीच गोष्ट या यानाला ‘क्युरिऑसिटी’ (उत्सुकता/जिज्ञासा) हे नाव देणाऱया क्लॅरोन्टा या अमेरिकेतील ‘पॅन्सस’ राज्यात सहावीत शिकणाऱया मुलीने ओळखली. 9000 सूचनांमधून तिने दिलेलं नावच ‘नासा’ने निवडलं. कारण तिचं सांगणं होतं की, उत्सुकता ही प्रत्येकाच्या मनात सतत तेवणारी ज्योत आहे. रोज सकाळी जाग आल्यावर मला आज काय घडेल याची उत्सुकता असे. तसं नसतं तर आपले मानसशास्त्र आज इथपर्यंत आलेच नसते. त्या रोजच्या जीवन ऊर्मीचं ‘क्युरिऑसिटी’ नाव योग्य वाटतं.
ते मान्य झालं. ‘प्रोब’च्या रूपाने मंगळावर पोहोचलं आणि अद्वितीय कार्यक्रम करून खगोल-विज्ञानात आपला ठसा उमटवणारं ठरलं.