शिशुवर्गातील मुलांनी सादर केले राष्ट्रीय शिक्षण धोरण

पुण्यातील एका शाळेने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी केली आहे. विशेष बाब ही आहे की या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे शिशुवर्गातील विद्यार्थ्यांनी एकत्र येत जाहीर केले आहे. या धोरणाची अंमलमजाबवणी करणारी ‘द अकॅडमिक स्कुल’ ही पुण्यातील पहिली शाळा ठरली आहे. या शाळेने गेल्या वर्षापासून राष्ट्रीय शिक्षण धोरणावर काम करायला सुरुवात केली होती. याबाबत विद्यार्थ्यांनी सविस्तर माहिती दिली. तसंच येत्या काही वर्षांमध्ये या धोरणाअंतर्गत पुढे काय काय पावलं उचलली जातील, याची रुपरेषाही मांडली. मोठा शिशु वर्गातील चार विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. त्याच वेळी मोठा शिशु आणि नर्सरी वर्गातील आठ विद्यार्थ्यांनी द अकॅडमिक स्कूलमधील वर्गांचे व्हीडिओ दाखवले. नर्सरीमधील इव्हा कळवडे या विद्यार्थिनीने राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पोस्टरचं अनावरण केलं.