
सामना ऑनलाईन । लंडन
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यावर लंडन येथे काही तरुणांनी हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने शरीफ या हल्ल्यातून बचावले आहेत. मात्र या हल्लेखोरांनी शराफ यांच्या घरावर लाथा मारत त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान शरीफ हे येत्या शुक्रवारी पाकिस्तानात परतणार असून त्यांना लाहोर विमानतळावरूनच अटक करण्यात येणार आहे.
This is ex Prime Minister of Pakistan Nawaz Sharif at Avenfield House. Disqualified, disgraced now a declared Criminal, absconding in London. This is how he’s treated by the people. Whattay pathetic life. pic.twitter.com/f1qd0EQ8XG
— JB (@badnocs) July 8, 2018
नवाज शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात न्यायालयाने दहा वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून ८० लाख पौंड दंडही ठोठावला आहे. शरीफ यांची मुलगी मरियम यांना सात वर्षांची तर जावई निवृत्त कॅप्टन सफदर यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. मात्र सध्या शरीफ सध्या लंडनमध्ये आहेत. शरीफ यांची पत्नी कुलसूम यांना कर्करोगाने ग्रस्त असून लंडनमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Another video of Public showing disrespect to the disgraceful ex-PM now a convict. pic.twitter.com/1glsXvIhdc
— JB (@badnocs) July 8, 2018
दरम्यान रविवारी लंडनमधील काही पाकिस्तानी तरुणांनी नवाज शरीफांच्या घराबाहेर त्यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी शरीफ यांच्या सुरक्षारक्षकाने त्यांचे हल्ल्यापासून रक्षण केले. मात्र त्यानंतरही आंदोलक शरीफ यांच्य़ा घराच्या दरवाजावर लाथा मारताना व्हिडीओत दिसत आहेत.
























































