पोलिसांचा खबऱ्या समजून नक्षलवाद्याकडून व्यक्तीची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । गडचिरोली

पोलिसांचा खबऱ्य़ा असल्याच्या संशयावरून एका आदिवासी तरूणाची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून शनिवारी रात्री हत्या केली. इसरू पोटावी असे मृत तरूणाचे नाव आहे. एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस ठाण्यांतर्गत सिनभट्टी येथे तो रहात होता. नक्षलवाद्यांनी सिनभट्टी गावातून त्याच अपहरण करून त्याला गावाबाहेर नेलं. नंतर त्याची हत्या करून त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून दिला.

शनिवारी रात्री ११ ते ११.३० वा सुमारास ४० ते ५० नक्षलवादी इसरुच्या घरी आले होते. त्याला मारहाण केली व त्याचे अपहरण केले. यावेळी इसरुचे वडील चैतू पोटावी,भाऊ बिजू,पत्नी जयवंती,मुले यांनी नक्षलवाद्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही नक्षलवाद्यांनी मारहाण केली

काही वेळानंतर इसरुचा मृतदेह गावाच्या बाहेरील रस्त्यावर गावकऱ्यांना आढळून आला. इसरु हा स्वस्त धान्य दुकान चालवत होता. त्याच्याकडे या दुकानातूनच रुपये १ लाख जमा झालेले होते.त्याने सदर रक्कम ही घरात ठेवलेली होती. नक्षलवाद्यांनी ही रक्कम इसरुच्या घरातून चोरून नेली.