साठ्ये महाविद्यालयात NCC च्या प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बी’  आणि ‘सी’ प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्या NCC कॅडेट्ससाठी मुंबईतील साठ्ये महाविद्यालयात एका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या आयोजनासाठी कोविड  नियमांचे व सूचनांचे पालन करण्यात आले होते.  हे प्रशिक्षण शिबीर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षांच्या कॅडेट्स साठी आयोजित करण्यात आले होते.  ‘3 महाराष्ट्र बटालियन , मुंबई’ चे प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल. सुदीप मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

ncc-camp-classroom-sathaye-college

या शिबिरातील प्रशिक्षण  आणि उपक्रमांचे संयोजन लेफ्टनंट गौरांग राजवाडकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.  या शिबिरामध्ये 275  कॅडेट्सनी आपला सहभाग नोंदवला होता. या शिबिरामध्ये कॅडेट्सना  लष्करी विषयाचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षण देण्यात आले.  हे  प्रशिक्षण आभासी माध्यमातून (ऑनलाईन पद्धतीने)  देणं अवघड होतं.  या शिबिराबाबत बोलताना  साठ्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव राजवाडे म्हणाले की  ‘सदर शिबीर   बी व सी  प्रमाणपत्र परीक्षेसाठी अनिवार्य करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र कॅडेट्सला आर्मी भरती तसेच सरकारी नोकरभरतीच्या विविध परीक्षांसाठी उपयुक्त ठरते’