भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा विकास नको, शरद पवारांनीही केला नैनाला विरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करणारा विकास काय कामाचा, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रासह राज्य शासनाला करून सिडकोच्या नैना प्रकल्पाला विरोध केला. हा प्रश्न अधिवेशनानंतर राज्य शासनासोबत बैठक घेऊन मार्गी लावू असे आश्वासने त्यांनी यावेळी दिले.

कळंबोली येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला. काही भांडवलदार स्वतःच्या फायद्यासाठी या सरकारमध्ये असून मुंबईतील अनेक उद्योग गुजरात, सुरत येथे नेण्याचे काम सुरू आहे. यासाठी आता एकजुटीने यांच्याविरुद्ध आवाज उठविण्याची गरज आहे, असे पवार म्हणाले.