माथाडी नेते नरेंद्र पाटील शिवसेनेत; साताऱ्यातून लढणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

माथाडी कामगारांचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी रविवारी या महासभेत शिवसेनेत प्रवेश केला. ते साताऱ्यातून लढणार आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाटील यांना पवित्र शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले. पक्षप्रवेशाबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, कुणाची पळवापळवी मला करायची नाही आहे. साताऱ्यासाठी हक्काने नरेंद्र पाटील यांना मागून घेतले आहे.

शिवसेनाप्रमुख आणि माथाडींचे नेते अण्णासाहेब पाटील यांचे सलोख्याचे संबंध होते. तोच वारसा आम्ही जतन करतो आहोत. माथाडी कामगारांनी फक्त दुसऱ्याची ओझीच व्हायची का, असा सवाल करतानाच उद्धव ठाकरे म्हणाले, माथाडींचा नेता खासदार बनवून मला दिल्लीत पाठवायचा आहे.