8 तास वीजपुरवठ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

40
protest

सामना ऑनलाईन, नेसावा

जायकवाडी बॅक वॉटर परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा ८ तास करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केले. बुधवारी सकाळी १० वाजता नगर-संभाजीनगर मार्गावर हे आंदोलन करण्यात आले. हा वीजपुरवठा 8 तास करण्यात आला नाही तर शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी दिला आहे. या आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटेनेचे नेतेही सहभागी झाले होते.

जायकवाडी बॅकवॉटर परिसरातील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा 4 तासांवर आणण्यात आला आहे. वीजपुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी आपण सरकार दरबारी अनेकदा प्रयत्न केले मात्र या प्रश्नी काहीही ठोस निर्णय न घेतल्याने आपल्याला आंदोलन करावे लागले असल्याचे लंघे-पाटील यांनी म्हटले आहे. नगर-संभाजीनगर रस्त्यावर करण्यात आलेल्या या आंदोलनाचा वाहनचालकांना आणि प्रवाशांना मात्र जबरदस्त त्रास झाला. या आंदोलनामुळे प्रवरासंगम परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या