जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धा निरज चोप्राच्या भाल्याचा “सुवर्णभेद”

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

हिंदुस्थानचा आघाडीचा भालाफेकपटू नीरज चोप्राने आपल्या खात्यात आणखी एका सुवर्णपदकाची भर घातली. फ्रान्सच्या सोतेकिले शहरात सुरू असलेल्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने ८५.१७ मीटर भाला फेकून सुवर्णवेध साधला. राष्ट्रकुल स्पर्धेपाठोपाठ नीरज चोप्राचे हे दुसरे सोनेरी यश होय. त्यामुळे आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेतही देशवासीयांना अशाच सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा असेल.

नीरज चोप्राने सुवर्णपदक जिंकताना ऍड्रीयन मार्डाने (८१.४८ मी.) आणि एडिस मॅटसेक्हिशियस (७९.३१ मी.) यांना पिछाडीकर टाकले. २०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमधील विजेता केशॉर कॅलकॉटला या स्पर्धेत पाचव्या स्थानाकर समाधान मानावे लागले. त्याला ७८.२६ मीटर अंतरापर्यंतच भाला फेकता आला.

नीरजने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ८६.४७ मीटर कामगिरीसह सुकर्णपदक जिंकले होते आणि राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पहिला हिंदुस्थानी भालाफेकपटू ठरला होता. २० वर्षीय नीरजने २०१६ मध्ये २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील कनिष्ठ गटात विश्व विक्रमासह ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले होते. मात्र त्याच वर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिकची पात्रता निश्चित करण्यात तो अपयशी ठरला होता. फ्रान्समधील या सोनेरी यशानंतर सोशल मीडियावर नीरजवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.