हिंदुस्थानी आंब्यांवर नेपाळने घातली बंदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान आणि नेपाळ या दोन देशांतील संबंध पूर्वीसारखे सलोख्याचे राहिलेले दिसत नाहीत. नेपाळमध्ये सत्ताबदल झाल्यानंतर तेथील नव्या सरकारने काही गोष्टींना उघडपणे विरोध दर्शवला असताना आता अचानक हिंदुस्थानातील आंब्यांवर बंदी घातली आहे. नेपाळ सरकारच्या या निर्णयामुळे हिंदुस्थानातून निर्यात होणाऱया आंब्यांना फटका बसणार आहे. नेपाळ आधी जपान सरकारनेही हिंदुस्थानी आंब्यांवर बंदी घातली होती.

नेपाळकडून बंदी घालण्याचा निर्णय होण्याआधी हिंदुस्थानातून 15.8 मेट्रिक टन आंबा नेपाळच्या सीमेवर दाखल झाला आहे. नेपाळी आंब्यांचा हंगाम फक्त दोन महिन्यांचा असतो. त्यामुळे व्यापारी मोठय़ा प्रमाणात हिंदुस्थानातून आंब्यांची आयात करत असतात, परंतु आता या निर्णयामुळे नेपाळमध्ये हिंदुस्थानी आंबे मिळणे मुश्किल झाले आहे. नेपाळने केवळ हिंदुस्थानी आंबेच नाही, तर हिंदुस्थानातून जाणाऱया अन्य काही फळांवरही बंदी घातली आहे.