नेटफ्लिक्सने आणला 199 रुपयांचा प्लॅन, वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

नेटफ्लिक्सने  199 रुपयांचा नवा प्लॅन सुरू केला आहे. स्वस्त स्मार्टफोनमध्येही या प्लॅनमुळे नेटफ्लिक्स बघता येणार आहे. मात्र हा प्लॅन घेणाऱ्यांना टीव्हीवर नेटफ्लिक्स पाहण्यासाठी कास्टींग करता येणार नाही. हा प्लॅन घेतल्यास HD ऐवजी SD व्हिडीओ पाहण्यात ग्राहकांना समाधान मानावे लागेल. पण स्वस्त असल्याने अनेक जण व्हिडीओच्या दर्जापेक्षा त्यातील आशयाला महत्व देत या प्लॅनवर तुटून पडतील अशी दाट शक्यता आहे.

नेटफ्लिक्सने दिलेल्या माहितीनुसार जगाच्या तुलनेत मोबाईलवर नेटफ्लिक्स बघणाऱ्या हिंदुस्थानी प्रेक्षकांचे प्रमाण कित्येक पट अधिक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवूनच हा नवा प्लॅन सुरू करण्यात आला. यापूर्वी नेटफ्लिक्सचा सगळ्यात स्वस्त प्लॅन 500 रूपयांचा होता आणि देशातील ऑनलाईन स्ट्रीमिंग सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये या कंपनीची सेवा सगळ्यात जास्त महागडी होती.