
सामना प्रतिनिधी । मुंबई
द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर गुरुवारी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘पद्मश्री’ हा देशातील मानाचा पुरस्कार मिळवणारे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू घडवणारे द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणे अपेक्षित होते, पण महाराष्ट्र राज्य सरकारला याचा विसर पडला. त्यांच्या अनास्थेबद्दल तमाम क्रिकेटप्रेमींमध्ये सोशल मीडियावर तीक्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याप्रसंगी ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर याच्यासह क्रिकेटविश्वाने साश्रुनयनांनी रमाकांत आचरेकर सरांना अखेरचा निरोप दिला.
सरकारमध्ये संवादाचा अभाव! – प्रकाश मेहता
सिने अभिनेत्री श्रीदेवी हिच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते, मात्र हिंदुस्थानात महान क्रिकेटपटूंची पिढी घडवणारे रमाकांत आचरेकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार का नाही करण्यात आले, असा सवाल क्रिकेटप्रेमींकडून सोशल साइटवर विचारला गेला. यावर महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न केल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतानाच सरकारमध्ये संवादाचा अभाव असल्याचे स्पष्टपणे सांगितले. यानंतर क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी रमाकांत आचरेकर यांच्या कार्याचा गौरव केला जाईल असे आश्वासन दिले.
मास्टरब्लास्टर, पंडित, अमरे, दिघे, कांबळी यांनी दिला पार्थिवाला खांदा
रमाकांत आचरेकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे क्रिकेटमध्ये उत्तुंग शिखर सर करणाऱया बहुतांशी क्रिकेटपटूंनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि त्यांना आदरांजली वाहिली. सचिन तेंडुलकर, प्रवीण अमरे, चंद्रकांत पंडित, समीर दिघे, विनोद कांबळी यांनी त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यावेळी शेकडो क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहून रमाकांत आचरेकर यांना श्रद्धांजली वाहिली.
‘टीम इंडिया’ची रमाकांत आचरेकरांना श्रद्धांजली
क्रिकेटपटूंची खाण घडविणारे महागुरू रमाकांत आचरेकर यांच्या निधनामुळे ‘टीम इंडिया’च्या खेळाडूंनी गुरुवारी दंडावर काळय़ा फिती बांधून श्रद्धांजली वाहिली. याच सामन्यात ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या दंडाकरही काळय़ा फिती दिसून आल्या. मात्र त्याचे कारण केगळे होते. 29 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू बिल कॉटसन यांचे निधन झाले. 87 क्या कर्षी त्यांनी अखेरचा श्कास घेतला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही काळय़ा फिती दंडाकर बांधून मैदानात उतरले.



























































