
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने निर्बंध लागू केले आहेत. त्या नियमांमध्ये काही नवीन सूचनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये कोरोना चाचण्या, सरकारी केंद्रे, पासपोर्ट तसेच आवश्यक सेवांचा समावेश आहे.
या आहेत सूचना
1. जिथे जिथे लसीकरण न झालेल्या व्यक्तींसाठी आरटीपीसीआर चाचण्या बंधनकारक केल्या होत्या, तिथे आता पर्याय म्हणून रॅपिड अँटिजेन चाचण्या करू शकतात. 10 एप्रिलपासून अंमलबजावणी होणार
2. सर्व आपले सरकार सेवा केंद्र, पासपोर्ट सेवा, सेतू केंद्र आठवड्यात सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहू शकतात.
3. वृत्तपत्रांमध्ये मासिके, नियतकालिके, जर्नल्स यांचा देखील आवश्यक सेवेत समावेश






























































