मुंबई सेंट्रल येथे उभारणार आधुनिक प्रतीक्षालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी टर्मिनसवर विमानतळाप्रमाणे अत्याधुनिक प्रतीक्षालय उभारण्यात आल्यानंतर आता पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल टर्मिनसवर अशा धर्तीवर अत्याधुनिक प्रतीक्षालय उभारले जाणार असून त्यात पहिल्या दोन तासांसाठी अवघे दहा रुपये भाडे असणार आहे.

मुंबई सेंट्रल टर्मिनसवर प्रतीक्षालयाचे काम सुरू झाले आहे. येथे 80 ते 100 प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था असणार आहे. वातानुकूलित असलेल्या या प्रतीक्षालयात आरामदायी आसनव्यवस्था, वायफाय, वर्तमानपत्र, मॅगझिनची सुविधा देतानाच मसाज, स्पा, बूट पॉलिश, मोबाईल चार्जिंगचीही व्यवस्था असणार आहे. यासाठी 62 लाखांपेक्षा अधिक खर्च येणार आहे.