‘बिग बॉस’मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या ग्लॅमरस लूकमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नुकतेच तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. यावेळी निक्कीने बोल्ड ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे. सोबतच हलका मेकअप आणि खुल्या केसांनी तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. या फोटोंमध्ये ती प्रचंड बोल्ड आणि सुंदर दिसत आहे. तिच्या या ग्लॅमरस लूकने चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकवला आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्स करून तिच्या सौदऱ्याचे कौतुक केले आहे.