
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी अज्ञात व्यक्तीने फोन करून ही धमकी दिली. त्यामुळे नागपूर पोलिसांनी त्यांच्या नागपूर येथील निवासस्थान व कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवली आहे.
नितीन गडकरी यांना याआधीही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. गँगस्टर दाऊद इब्राहिम याच्या नावाने धमकीचे फोन आले होते. त्यावेळी त्यांच्याकडे 100 कोटींच्या खंडणीची मागणी देखील करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी जयेश कांथा उर्फ जयेश पुजारी याला अटक केली आहे. पुजारीने सलग दोनदा नितीन गडकरी यांना धमकी दिली आहे.





























































