दारुडे झाला आहात तुम्ही, नितीश कुमार भाजप आमदारांवर भडकले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे आज बिहारच्या विधानसभेत भाजप आमदारांवर भडकले. राज्यातील सारण जिल्ह्यातीस छप्रा येथे विषारी दारू प्यायल्याने 20 जणांचा मृत्यू झाला. त्याप्रकरणावरून विरोधी पक्षाने विधानभवनात आंदोलन केले. या आदोलकांवर नितीश कुमार भडकले.

विधानभवनात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर नितीश कुमार चिडले व त्यांनी भाजप आमदारांना दारुडे म्हटले. ”काय झालेय? दारुडे झाला आहात तुम्ही?” असे नितीश कुमार आंदोलक आमदारांवर ओरडले. नितीश कुमार यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या वक्तव्यानंतर भाजप आमदारांनी नितीश कुमार यांच्याविरोधात आंदोलन करत त्यांनी माफी मागण्याची मागणी केली आहे.