भाजपसोबत युती करण्यापेक्षा राजकारणातून निवृत्त होईन- मायावती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mayawati

भाजपसोबत युती करण्यापेक्षा राजकारणातून निवृत्त होईन असे वक्तव्य बसप अध्यक्ष मायावतींनी केले आहे. काही दिवसांपूर्वी मायावती म्हणाल्या होत्या की  सपाचा उमेदवार हरवण्यासाठी भाजपला मतदान करावे लागले तरी चालेल.

आज एका पत्रकार परिषदेत मायावती म्हणाल्या की, “भविष्यात कुठल्याही प्रकारे भाजपसोबत मैत्री शक्य नाही. भाजपची विचारसरणी आमच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. भाजपची विसारसरणी जातीयवादी आणि भांडवलवादी आहे, असेही मायावती म्हणाल्या.  भाजपशी युती करण्याऐवजी आपण राजकारणातून निवृत्त होऊ असेही मायावती म्हणाल्या.

गेल्या आठवड्यात विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीबद्दल बोलताना मायावती म्हणाल्या की, समाजवादी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी भाजप किंवा कुठल्याही पक्षाला मतदन करू. आता भाजपसोबत युती करण्यावरून त्यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.