‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी अर्ज नाही; रघुराम राजन यांची स्पष्टोक्ती

41
raghuram-rajan

सामना ऑनलाईन । लंडन

ब्लुमबर्ग न्यूजने केलेल्या सर्वेक्षणानुसार रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे ब्रिटनमधील 325 वर्षे जुन्या ‘बँक ऑफ इंग्लंड’च्या प्रमुखपदासाठी दुसऱया क्रमांकाचे दावेदार आहेत. मात्र ब्रिटनचे किंवा तेथील केंद्रीय बँकेचे राजकारण आपल्याला माहीत नाही. त्या बँकेच्या प्रमुखपदासाठी आपण अर्ज केलेला नाही, असे स्पष्ट मत रघुराम राजन यांनी येथे व्यक्त केले. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा संबंध ब्रेक्झिटशी जोडला जाऊ लागला आहे. बँक ऑफ इंग्लंडचे सध्याचे गव्हर्नर मार्क कार्नी यांचा कार्यकाल 31 जानेवारी 2020 रोजी पूर्ण होत आहे. त्यांच्या जागी कोण? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 2003 ते 2006 या कालावधीत रघुराम राजन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये मुख्य अर्थतज्ञ म्हणून काम पाहिले होते. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बनण्याआधी 2013 मध्ये त्यांनी केंद्र सरकारचे सल्लागार म्हणूनही काम केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या