
ट्रॅक, ओव्हरहेड आणि सिग्नलिंग उपकरणांच्या देखभाल दुरुस्तीच्या चे कामासाठी 18 आणि 19 (शनिवार, रविवार) फेब्रुवारीच्या मध्यरात्री 00.00 ते 04.00 या वेळेत मुंबई सेंट्रल आणि माहीम स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे, रविवारी 19 फेब्रुवारी 2023 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरी विभागात दिवसाच्या वेळेत कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नाही.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. ब्लॉक कालावधीत, मुंबई सेंट्रल आणि अंधेरी/सांताक्रूझ स्थानकांदरम्यान उपनगरीय सेवा धीम्या मार्गावर चालवल्या जातील. याबाबतची सविस्तर माहिती संबंधित स्टेशन मास्टर्सकडे उपलब्ध आहे. प्रवाशांनी वरील व्यवस्थेची नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.



























































