शरद पवार यांना इन्कम टॅक्सची नोटीस नाही, निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना इन्कम टॅक्सची कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचे स्पष्टीकरण आज केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरून इन्कम टॅक्सची नोटीस आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत दिली होती. यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवार यांना इन्कम टॅक्सची नोटीस आल्याचे प्रसिद्ध झालेले वृत्त चुकीचे असून केंद्रीय निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष आयकर विभागाला नोटीस जारी करण्यासंबंधीचे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत असे आयोगाने नमूद केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या