सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हापरिषद शिक्षण विभागाच्या वतीने यंदाचे आदर्श शिक्षक पुरस्कार मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी जाहीर केले. कला, क्रीडा आणि संगीत क्षेत्रात राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर चमकदार कामगिरी करणाऱ्या शिक्षकाला विशेष पुरस्कार देण्यात येतो. यंदा विशेष पुरस्कारासाठी एकही शिक्षक पात्र ठरला नाही. पटसंख्येत गडगडणाऱ्या जिल्हापरिषदेसाठी हे खेदजन्य गोष्ट आहे.
जिल्ह्यातील नऊ शिक्षकांना आदर्श पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामध्ये मंडणगड- सुहास रांगले, दापोली -सुभाष काताळकर, खेड-संतोष जाधव, चिपळूण-संजय सोनावणे, गुहागर- रवींद्र कुळये, संगमेश्वर – प्रकाश गेल्ये, रत्नागिरी- मैथिली लांजेकर, लांजा- सुहास वाडेकर, राजापूर- तानाजी मासये यांना जाहीर झाला असून 5 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता शामराव पेजे सभागृहात पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती जि.प.अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी दिली. यावेळी शिक्षण सभापती सहदेव बेटकर, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, महिला आणि बालकल्याण सभापती साधना साळवी, शिक्षण अधिकारी डी.बी.कुलाल उपस्थित होते































































