
टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर शुभमन गिल याला डेंग्यूची लागण झाल्यामुळे विश्वचषकाच्या पहिल्या सामन्याला मुकला होता. आता त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. मात्र, तो बुधवारी होणाऱ्या अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातही खेळणार नसल्याची माहिती मिळाली आहे. 14 ऑक्टोबरला होणार्या पाकिस्तानच्या बहुप्रतिक्षित लढतीपर्यंत तो तंदुरुस्त नसेल तर या सामन्यालाही तो मुकण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाचा फलंदाज शुभमन चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्धचा पहिला सामना खेळू शकलेला नाही. आता टिम इंडियाचा पुढील सामना 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत अफगाणिस्तान विरुद्ध होणार आहे. या लढतीलाही तो मुकणार आहे. सध्या तो चेन्नईतच वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असेल, असे बीसीसीआयच्या निवेदनात म्हटले आहे. सध्याच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या गिलला शुक्रवारी डेंग्यू तापाची लागण झाली. त्यामुळे तो पहिला सामना खेळू शकला नाही.
🚨 Medical Update: Shubman Gill 🚨
More Details 🔽 #TeamIndia | #CWC23 | #MeninBluehttps://t.co/qbzHChSMnm
— BCCI (@BCCI) October 9, 2023
डेंग्यूसाठी सात दिवसांत प्रकृती सुधारते. त्याची प्रकृती सुधारत असून तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. त्यामुळे तो पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याशिवाय सामना खेळू शकणार नाही. आता तो अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून पाकिस्तानविरोधातील सामना तो खेळणार का, याबाबत क्रीडारसिकांना उत्सुकता आहे.
























































