घोरल्याने 1 हजार उठाबशा काढायला लावल्या, किम जोंगच्या सैनिकांनी दिली तालिबानी शिक्षा

संयुक्त राष्ट्राची सर्वसाधारण सभा सप्टेंबर महिन्यात पार पडणार आहे. या सभेमध्ये एक अहवाल मांडला जाणार आहे. उत्तर कोरियामध्ये पकडलेल्या लोकांचा कसा छळ होतो याची माहिती या अहवालाद्वारे जगासमोर मांडली जाणार आहे. हा अहवाल मुख्यत्वे ऑगस्ट 2020 ते जुलै 2021 मध्ये घडलेल्या घटनांवर आधारीत आहे. मात्र अहवालात 2010 ते 2019 मध्ये घडलेल्या काही घटनांचाही समावेश करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अंटोनिओ गुटेरस हा अहवाल लोकांसमोर मांडणार आहेत. त्यांनी म्हटलंय की उत्तर कोरियाने पकडलेल्या लोकांवर अमानवी अत्याचार केले असण्याची शक्यता आहे. या अहवालामध्ये गुप्तचर यंत्रणांनी जमा केलेली माहिती आणि उत्तर कोरियाने पकडलेल्या लोकांनी सांगितलेल्या सत्यघटनांचा समावेश असणार आहे. यातल्या एका महिलेने सांगितलं की तिला खुर्ची, दांडके आणि पट्ट्याने मारहाण केली जायची. काहींना तुरुंगाच्या दाराच्या दांड्यावर डोकं ठेवायला सांगितलं जायचं आणि सैनिक त्यांच्या डोक्याचा वापर पंचिंग बॅगसारखा करायचे. दुसऱ्या एका व्यक्तीने सांगितलंय की त्यांच्या बराकीतील एका कैद्याला झोपेत घोरत असताना पकडल्याने 1 हजार उठाबशा काढायला लावल्या होत्या. ही शिक्षा पूर्ण करत असताना हा वयोवृद्ध कैदी कोसळला होता असंही कैद्याने सांगितलं आहे.

कोरोनाला संपवण्यासाठी कबुतर, मांजरांचा खात्मा करा; किम जोंग उनचे अजब फर्मान

हुकुमशाही आणि आपल्या विचित्र आदेशांसाठी उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग ओळखला जातो. संपूर्ण जगात कोरोनाचे संकट असताना किम जोंगने देशातील कबुतर आणि मांजरांना मारण्याचे आदेश दिले आहेत. देशात कबुतर आणि मांजरांमुळे कोरोनाचा फैलाव होत आहे असे किम जोंगला वाट आहे. त्यामुळे त्याने कबुतर आणि मांजरांना मारण्याचे आदेश दिले आहेत.

चीनच्या सीमेवरून जे जे प्राणी येतील त्यांना मारण्याचे आदेश किम जोंग उनने दिले आहेत. चीनमधून येणार्‍या प्राण्यांमधून कोरोनाचा फैलाव होत असल्याचा दावा किम जोंग उनने केला आहे. त्यामुळे देशातील मांजर आणि कबुतरांना मारण्याचे आदेशने किमने दिले आहे. हा निर्णय अतार्किक असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली होती. एका कुटुंबाकडे मांजर असल्याने त्यांना 20 दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या