महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, कर्नाटकच्या विधिमंडळात एकमताने ठराव मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कानडी सरकारने आज सीमा भागातील एक इंचही जमीन महाराष्ट्राला देणार नसल्याची दर्पोक्ति करतानाच तसा एकमुखी ठराव विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर करत मराठी सीमा बांधकांच्या जखमेकर मीठ चोळले आहे. बेळगाव-निपाणीसह संपूर्ण सीमाभाग आमचाच आहे, त्यामुळे तो देण्याचा प्रश्नच नाही. केंद्रीय गृहमंत्र्यांनी नुकतीच केलेली मध्यस्थी ही केवळ कायदा व सुव्यवस्थेपुरतीच मर्यादित असल्याचा दावाही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केला आहे.

सिद्धरामय्या म्हणतात, महाजन आयोगानेच सीमा प्रश्न सोडवलाय

कर्नाटक विधिमंडळात मांडलेल्या ठरावाला विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी पाठिंबा देतानाच कर्नाटक आणि महाराष्ट्रादरम्यान असलेला सीमाप्रश्न महाजन आयोगाच्या अहवालानेच सुटला आहे. संपलेल्या प्रश्नावरून शेजारील राज्यांनी उगाच वाद उभा करू नये असे म्हटले आहे.

सीमा भाग हा कर्नाटकचाच भाग आहे. याबाबत मी गंभीर असून केंद्रीय गृहमंत्रीच काय, पण पंतप्रधानांपुढे किंवा सर्वोच्च न्यायालयापुढे गेलो तरी आमच्या भूमिकेत कोणताच फरक पडणार नाही.

  • बसवराज बोम्मई, मुख्यमंत्री, कर्नाटक