पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळय़ाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज ईडीला नोटीस बजावली. शिक्षक भरती प्रक्रियेत अनियमिततेचा ठपका ठेवत ईडीने तृणमूल काँग्रेसचे आमदार माणिक भट्टाचार्य यांना अटक केली होती. भट्टाचार्य यांनी जामिनासाठी 16 नोव्हेंबर रोजी कोलकाता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, परंतु ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत भट्टाचार्य यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने ईडीला उत्तर देण्यास सांगितले आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी आणि एस. सी. शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
























































