
घरातून निघण्याआधी मोबाईलमधील अॅपवरून पार्किंग बुक करण्याची सुविधा मुंबईकरांना लवकरच मिळणार आहे. यासाठी पालिका लवकरच एक अॅप कार्यान्वित करणार आहे. यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मुंबईतील बेकायदा पार्पिंगसह वाहतूककोंडीचा प्रश्नही सुटण्यास मदत होणार आहे.
मुंबईत दररोज वाढणाऱया गाडय़ांमुळे आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूककाsंडी व पार्पिंगची समस्या निर्माण होत आहे. पालिकेच्या उपलब्ध 32 वाहनतळांवर ही व्यवस्था पुरेशी ठरत नाही. त्यामुळे पालिकेकडून पार्किंग धोरण राबवण्यात येत आहे. या सुविधेमुळे पार्पिंगसाठी जागा शोधत आता गाडी फिरवत बसण्याची गरज नाही. ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी पार्किंगसाठी जागा उपलब्ध असल्याची माहिती पोहचण्यापूर्वीच समजणार असून मोबाईलवरूनच पार्किंग बुक करता येणार आहे. यासाठी पालिका मुंबईतील खासगी सोसायटय़ा, ‘म्हाडा’, सरकारी-खासगी कार्यालयांच्या मोकळय़ा जागेत पार्पिंगसाठी जागा निश्चित केली जाणार आहे. शिवाय ऑन रोड व ऑफ रोड पार्पिंगसाठी व्यवस्था केली जाणार आहे.
गाडय़ा चोरीचा प्रश्नही मिटणार
पार्किंग अॅपमुळे 1 लाख 25 हजार 510 वाहने पार्क करता येणार आहेत. या पार्किंगसाठी लागणाऱया शुल्काचा ऑनलाइन भरणा करता येणार आहे. या सुविधेमुळे गाडय़ा चोरीचा प्रश्नही मिटणार आहे.
पालिकेच्या पार्किंग अॅपमुळे मुंबईकरांना 24 तास कधीही ऑनलाइन पार्किंग बुक करता येणार आहे. मानवी हस्तक्षेपाशिवाय शुल्क भरता येईल. या सुविधेसाठी एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून पालिकेचे पार्पिंग लॉट्स, रस्त्यालगतच्या जागा, खासगी गृहनिर्माण सोसायटय़ांच्या जागा सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध केल्या जातील. परदेशातील सुविधेच्या धर्तीवर ही सुविधा मिळेल.
– पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त






























































