डिसअपिअर मेसेज आता पाहता येणार, व्हॉट्सऍपचे नवे फिचर येतेय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअॅप सध्या अनेक नवीन फिचर्स आणण्याची तयारी करत आहे. यापैकी काही अॅपमध्ये आधीच अपडेट केले गेले आहेत आणि काही फीचर्स येत्या काळात नव्याने येतील. नवीन फीचरमध्ये युजर्सना डिसअपिअर मेसेज सेव्ह करता येईल.

डब्ल्यूएबीटाइन्पह् वेबसाइटने या फिचरबद्दल माहिती शेअर केली आहे. त्यानुसार, मेसेजिंग अॅप यूजर्सना डिसअपिअर झालेले मेसेज पह्नमध्ये सेव्ह करण्याची सुविधा देईल. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जेव्हा यूजर्सला डिसअपिअर चॅटमधील खूप आवश्यक असलेला मेसेज गमावायचा नसतो, तेव्हा ते त्या मेसेजच्या एक्सपायरी डेटपूर्वी सेव्ह करू शकतात. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही डिसअपिअर झालेले काही मेसेज डिसअपिअर होण्यापासून रोखू शकता. या फीचरला ‘कीप मेसेज’ असे नाव देण्यात येऊ शकते.

मोठी फाईल होणार शेअर
अलीकडेच व्हॉट्सअॅपमध्ये 2 जीबी आकाराच्या फाइल्स शेअर करण्याची सुविधा जारी करण्यात आली आहे. या सर्व फाइल्स एंड टू एंड एनक्रिप्टेड असतील. यापूर्वी अॅपमध्ये फक्त 100 एमबी फाइल्स ट्रान्सफर करण्याची सुविधा होती. मात्र, एवढी मोठी फाइल शेअर करण्यासाठी युजर्सना वायफायशी कनेक्ट असणे आवश्यक आहे.