शिवसेना-भाजप युतीचा रविवारी नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्र मेळावा

85
bjp-shivsena

सामना प्रतिनिधी। नाशिक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी, 17 मार्च रोजी नाशिकमध्ये शिवसेना-भाजपा युतीचा उत्तर महाराष्ट्र मेळावा होणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी शुक्रवारी भाजपा कार्यालयात युतीचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली.
भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात शुक्रवारी दुपारी बैठक झाली. उत्तर महाराष्ट्रातील युतीचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचा संयुक्त मेळावा रविवारी दुपारी 3 वाजता नाशिक येथील चोपडा लॉन्स येथे होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावेळी मार्गदर्शन करतील.

या बैठकीस भाजपा प्रदेश प्रवक्ते सुहास फरांदे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील पाटील, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, खासदार हेमंत गोडसे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल आहेर, आमदार अनिल कदम, आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, उदय सांगळे, भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव, विजय साने, प्रशांत जाधव, सचिन ठाकरे, नंदकुमार खैरनार, महापालिका सभागृह नेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेना गटनेते विलास शिंदे, संभाजी मोरुस्कर, दत्ता गायकवाड, निवृत्ती जाधव, जगन आगळे, शिवसेना महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, सुधाकर बडगुजर, दीपक खुळे, सतिश कुलकर्णी, शिवाजी चुंबळे, अनिल ढिकले आदी हजर होते.

नाशिक लोकसभा समन्वय समिती

पालकमंत्री गिरीष महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते, सुनील बागुल, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, भाजपा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन ठाकरे, प्रशांत जाधव, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, शिवसेना महापालिका गटनेते विलास शिंदे, नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचा या समितीत समावेश आहे, असे भाजपा कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या