त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन दहा दिवस बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात 12 ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन सुविधा बंद ठेवण्यात आली आहे. सामान्य भाविकांची होणारी गैरसोय, तसेच दर्शन व्यवस्थेवरील ताण लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने केंद्र, राज्य शासन किंवा जिल्हाधिकाऱयांमार्फत प्राप्त राजशिष्टाचारासंबंधित पत्रव्यवहाराव्यतिरिक्त इतर सर्व प्रकारचे व्हीआयपी दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.