रशियाच्या रस्त्यावर 3000 टनाच्या आण्विक पाणबुडीचे संचलन, वस्तुसंग्रहालयात होणार रुपांतर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवमाशाप्रमाणे प्रतिकृती असणाऱ्या 3000 टन क्षमतेच्या आण्विक पाणबुडीचे बुधवारी रशियाच्या रस्त्यावरून संचलन करण्यात आले. ‘K-3 लेनिन्स्की कोमसोमोल’ असे तिचे नाव असून तब्बल 352 फूट लांबीची ही पाणबुडी आहे. ती ज्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे, तिथे तिचे वस्तुसंग्रहालयात रुपांतर केले जाणार आहे. नेरपा शिपयार्ड येथे अनेक वर्षांपासून या प्रकल्पाचे काम सुरू होते.

दुरुस्ती केल्यामुळे आणि अणुभट्ट्यांचे किरणोत्सर्गी भाग बाहेर काढण्यात आल्याने, हे जहाज आता जनतेला जवळून पाहण्यासाठी वस्त संग्रहालयात रुपांतरीत करण्यात येणार आहे. सेंट् पीटर्सबर्गजवळील क्रोनस्टॅड शहरात तयार होणाऱ्या वस्तूसंग्रहालयात ती ठेवण्यात येणार आहे. K-3 ही पाणबुडी लाकडात प्रोटोटाइप केलेली होती. ती मोलोटोव्स्कमध्ये बांधली गेली आणि 1957 मध्ये प्रथमच वापरण्यात आली.