
अभिनेत्री मलायका अरोरा ही तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. मलायकाने केलेली फॅशन ही कायमच चर्चेचा विषय असते. वयाच्या 46 व्या वर्षीही मलायकाची फॅशन व तिचा हॉटनेस एखाद्या तरुण अभिनेत्रीला लाजवेल असा आहे. मात्र सध्या मलायका ही तिच्या न्यूड जीम वेअरवरून ट्रोल होत आहे. नेटकऱ्यांना तसेच तिच्या बऱ्याचशा चाहत्यांना देखील तिचा हा लूक आवडला नसून त्यांनी तिला ट्रोल केले आहे.
मलायका ही मोठ्या पडद्यापासून काही काळ दूर असली तरी फिटनेस फ्रिक असल्यामुळे ती जिमला मात्र दांडी मारत नाही. त्यामुळे मलायकाचा जिम लूक देखील चर्चेचा विषय असतो. मात्र याच जिम लूकमुळे यावेळेस मलायका ट्रोल झाली आहे. मलायकाने न्यूड रंगाचा अगदी घट्ट असा जिम सूट घातला होता. तिचा हा लूक नेटकऱ्यांना बिलकूल आवडलेला नसून अनेकांनी तिच्या या लूकला नापसंती दर्शवली आहे. काहींनी तिला प्रसिद्ध अभिनेत्री किम कार्दाशियनची कॉपी करणं बंद कर असा सल्ला देखील दिला आहे.
काही दिवसांपूर्वी बोनी कपूर आणि श्रीदेवीची मोठी मुलगी व अभिनेत्री जान्हवी कपूर ही देखील तिच्या न्यूड लूकमुळे चर्चेत आली होती. जान्हवीचा न्यूड लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता व तिच्या लूकची बी टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगली होती. तिने न्यूड रंगाचा टाईट पेन्सिल ड्रेस घातला होता. त्या ड्रेस सोबत तिने सफेद रंगाचे स्निकर्स आणि काळी बॅग घेतली होती. तिचा हा लूक प्रसिद्ध अभिनेत्री किम कार्दाशियनच्या लूकवरून डिझाईन करण्यात आला होता असे बोलले जात आहे. जान्हवीच्या आधी किमने न्यूड रंगाचा शॉर्ट टाईट ड्रेस घातला होता. तिचा तो लूक देखील खूप चर्चिला गेला होता.
























































