विहिरीत आढळला ननचा मृतदेह, केरळमधील धक्कादायक घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोल्लम

केरळच्या कोल्लम मधील पठानपुरम मधील माऊंट टबोर कॉन्वेंटमध्ये रविवारी एका ५४ वर्षीय ननचा मृतदेह आढळला आहे. मृत ननचे नाव सिस्टर सुजॅन असून त्या स्टीफेंस शाळेत शिकवत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९ वाजता माऊंट टाबोर कॉन्वेंट संस्थेच्या कर्मचार्‍यांना वहिरीपाशी रक्ताचे सडे सापडले. त्यानंतर त्यांना सुजॅनचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगताना आढळला. कर्मचार्‍यांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले.

काँग्रेस नेते बिंदू कृष्णा यांनी ही घटना दुखद असल्याचे सांगितले आहे. ननच्या खोलीत रक्ताचे डाग आढळल्याचे त्यांनी सांगितले तसेच त्यांचे केसही कापल्याचे त्यांनी नमूद केले. या प्रकरणाचा योग्य तपास लागला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कर्मचार्‍यांचे जबाब नोंदवण्यास सुरूवात केली आहे.