
>> आसावरी जोशी
ओदिशातील हत्ती अन्न पाण्याच्या शोधात गडचीरोलीत गेल्या वर्षभरापासून मुक्कामी आहेत. यामध्ये शेतपिकांचे नुकसान होते आहे. मुळात अरण्यातील अनेक बफर झोनमध्येच गावं आणि शेते लागली आहेत.. मग प्राण्यांनी जायचे कुठे..? हत्ती ओडिशा की इतर कोणत्याही प्रांतातील असो.. त्यांना अन्न निवारा उपलब्ध करून देणे हे प्रत्येक राज्यातील शासनाचे कर्तव्य आहे..
सध्या आपल्याकडे हव्याहव्याशा पाहुण्याचा मोसम सुरु आहे. परदेशी पक्ष्यांसोबत ओदिशातील काही ऐसपैस पाहुणे गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात मुक्कामी आहेत. दोन हजार किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास करीत गडचिरोलीच्या अरण्यात ओदिशातील हत्ती कधीचेच दाखल झाले आहेत. २३ लहान मोठ्या हत्तींचा हा कळप पोषक वातावरणामुळे पूर्व विदर्भात स्थिरावण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवली आहे. भरपूर चारा आणि पाणी असलेल्या भागांत या हत्तीचा मुक्काम असतो, दिवसा अरण्यात आराम करणे.. आणि रात्रीच्या अंधारात चरण्यासाठी बाहेर पडणे हा त्यांचा दिनक्रम आहे. यात ते धान्यपिकांचीही नासधूस करतात. यातून मानव – हत्ती संघर्ष अटळ होण्याची चिन्हे आहेत. या हत्तींवर पाळत ठेवण्यासाठी गडचिरोलीचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी पश्चिम बंगाल येथील सेझ फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेला ऑगस्ट २०२२ मध्ये बोलाविले. या संस्थेचे सहा लोक ( हुल्ला पार्टी ) या हत्तींवर पाळत ठेवून आहेत. हत्तींनी गावात शिरण्याचा प्रयत्न केला की त्यांना मशाली पेटवून रोखण्याचे काम ही हुल्ला पार्टी करते.
इथे प्रश्न पडतो की हा यावर कायमस्वरूपी मार्ग आहे का? हत्ती ओदिशातील असो.. वा देशातील इतर कोणत्याही भागातील.. आपल्या देशातील प्राण्यांचे संवर्धन करणे हे कोणत्याही राज्यातील शासनाचे कर्तव्य आहे. उदाहरणादाखल एक घटना लक्षात घेऊया. मध्यंतरी चीनमधल्या हत्तींच्या एका कळपानं जगभरातील शास्त्रज्ञांच्या अनेक समजुतींना धक्का दिला. हत्ती नेहमीच छोट्या छोट्या अंतरांचे प्रवास करतच असतात. पण चीनमधल्या या हत्तींच्या कळपाने जवळपास वर्षभरापासून अधिक काळ प्रवास करत 500 किलोमीटरपेक्षाही अधिक प्रवास केला . या लांब पल्ल्याच्या प्रवासात हे हत्ती त्यांच्या मूळ अधिवासापासून पुष्कळ दूर आले. त्यांनी गेल्या वर्षी वसंत ऋतूत चीनच्या नैऋत्य भागात असलेल्या शियुंगबना राष्ट्रीय अभयारण्यातून प्रवासाला सुरुवात केल्याचं सांगितलं गेलं. म्यानमार आणि लाओसच्या सीमांना लागून असलेला हा प्रदेश आहे. या हत्तींनी आधी उत्तरेकडे जायला सुरूवात केली. अनेक गावांमधून आणि शहरांमधूनही या हत्तींनी प्रवास केला. तो करत असताना त्यांनी लोकांचे दरवाजे तोडले, दुकानांमध्ये घुसले, खाणं उचलून नेलं, चिखलात धुडगूस घातला, कालव्यांमध्ये आंघोळ केली आणि जंगलामधल्या खड्ड्यांत झोपही काढली. त्यांनी पीकांचीही नासधूस केली. त्यानंतर त्यांनी पुन्हा दक्षिणेकडे प्रवास करायला सुरुवात केली. हा कळप यक्सी शहराजवळच्या शिजे भागात शेवटचा दिसला होता. ते आता परत चालले आहेत का किंवा मुळात त्यांनी हा इतका लांब पल्ल्याचा (आतापर्यंत हत्तींच्या कळपानं केलेला सर्वांत मोठा) प्रवास केलाच का या प्रश्नांची उत्तरं अजूनही मिळालेली नाहीत. त्यांची पुढची हालचाल काय असेल याचाही अजून अंदाज बांधता येत नव्हता.
याचा संबंध नक्कीच अन्न, पाणी आणि निवारा या मुलभूत गरजांशी होता. आशियाई हत्तींचं वास्तव्य ज्या ज्या जंगलांमध्ये होतं, तिथे आता मानवी हस्तक्षेप वाढत चालला आहे ही वस्तुस्थिती पण यातून दिसते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट होणं किंवा ते विभागले जाणं तसंच अन्न पाण्याची कमतरता निर्माण होण्यासारख्या समस्या वाढत आहेत.
इतर सस्तन प्राण्यांच्या तुलनेत हत्तींचं वर्तन हे मनुष्याच्या वागण्याशी जास्त मिळतजुळतं असतं. जन्माचा आनंद, मृत्यूचं दुःख, अनोळखी प्रदेशात गेल्यावर निर्माण होणारी बैचेनी हे सगळं माणसांसारखंच असतं. याच प्रवासात कळपातल्या दोन माद्यांनी पिलांना जन्मही दिला. याचंही संशोधकांना आश्चर्य वाटत आहे. “हत्ती हे सवयींचे पक्के आणि त्यांच्या दिनक्रमाला चिकटून राहणारे असतात. त्यामुळेच गर्भारपणात असा प्रवास करणं ही हत्तींचा स्वभाव पाहता अनैसर्गिक वाटणारी गोष्ट आहे. कारण या काळात ते सर्वांत सुरक्षित जागा शोधण्याचा प्रयत्न करत असतात. मोठ्या खड्ड्यात झोपलेल्या या हत्तींचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. या फोटोतलं असं एकत्र झोपण्याचं हत्तींचं वागणंही नेहमीचं नाहीये.
“हत्तींच्या कळपात पिलं सहसा जमिनीवर झोपतात आणि मोठे हत्ती झाडांचा किंवा वाळवीच्या वारूळाचा आधार घेऊन कलंडतात. कारण हत्तीचा देह इतका अवजड असतो, की जमिनीवर आडवं झोपल्यानंतर एखादं संकट आलं तर त्यांना पटकन उठताही येत नाही. शिवाय पूर्णपणे आडवं होऊन झोपल्यानं त्यांच्या हृदयावर तसंच फुफ्फुसावर ताण येतो,” असं त्या सांगतात. “त्यांच्या तशा झोपण्यातून ते प्रचंड थकले असल्याचं, त्यांच्या अंगातील त्राण निघून गेल्याचं जाणवत होतं. त्यांच्यासाठी हा सगळा प्रवास नवीनच असणार. हत्ती जेव्हा प्रवास करतात, तेव्हा चालताना त्यांच्या वजनामुळे जी कंपनं निर्माण होतात, त्यातून मागच्या हत्तींना दिशा कळत राहते. हा एकप्रकारे त्यांचा संवाद असतो. पण शहरांत-गावांमध्ये या हत्तींनी इतक्या प्रकारचे आवाज ऐकले, ते त्यांच्यासाठी दमवणारे असू शकतात.”
अधिवास नष्ट होणं
हे नेहमीप्रमाणे हत्तींकडून केलं जाणारं स्थलांतर नव्हतं, यावर शास्त्रज्ञांचं एकमत आहे. कारण हत्तींनी एका ठराविक मार्गाचा अवलंब केला नाही. चीन हा जगातील मोजक्या देशांपैकी आहे, जिथे हत्तींची संख्या वाढली आहे. संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाल्यामुळे हे शक्य झालं. चीननं तस्करी रोखण्यासाठी कठोर पावलं उचलली आणि त्याचा परिणाम म्हणून हत्तींची संख्या वाढली. युनान प्रांतात 1990 मध्ये हत्तींची संख्या 193 होती. आज इथे 300 च्या आसपास हत्ती आहेत. मात्र शहरीकरणं आणि जंगलं नष्ट झाल्यामुळे हत्तींचे अधिवास नष्ट झाले आहेत आणि याच कारणासाठी ते मुबलक अन्न असलेल्या नवीन अधिवासाचा शोध घेत आहेत, असं तज्ज्ञांना वाटतं. हत्तींना प्रचंड प्रमाणात खायला लागतं. त्यांच्या शरीराची ती गरजच असते. त्यामुळेच त्यांच्या आयुष्याचा बराचसा काळ हा दिवसाला 150 ते 200 किलो अन्न शोधण्यातच जातो.
हवाई निरीक्षण
हत्तींच्या या प्रवासात त्यांचा मनुष्यांसोबत कोठेही धोकादायक पद्धतीने संघर्ष झाला नसल्यानं तज्ज्ञांनी दिलासा व्यक्त केला. यामध्ये इतरही काही सकारात्मक बाबी आढळून आल्या आहेत. या हत्तींच्या प्रवासावर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे संशोधकांना हत्तींच्या मार्गात कोणतीही बाधा न आणताही बरीच माहिती मिळाली. शिवाय लोकांना कायम आठवणीत राहतील असे फोटोग्राफ पाहता आले. या कळपाचं रक्षण करण्यासाठी सरकार, स्थानिक प्रशासन आणि वन्यजीव संवर्धकांनी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख व्हायला हवा. गेल्या काही महिन्यांत चीनच्या प्रशासनानं हत्तींसाठी अन्न उपलब्ध करून दिलं. त्यांच्या मार्गात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून ट्रक उभे करून दिले. वाहतुकीसाठी रस्ते बंद केले. चीनमधील माध्यमंही हत्तींच्या प्रवासाची माहिती रोजच्या रोज घेत होती. सोशल मीडियावर तर हा कळप प्रचंड व्हायरल झाला होता. अशापद्धतीनं दखल घेतली गेल्यामुळे लोकांमध्ये जागरुकता आणि संवेदनशीलता वाढली. त्यामुळे जगभरातही वन्यजीव संवर्धनाला मदत होईल.

एव्हढी संवेदनशीलता जर चीनसारख्या देशात दाखवली जाऊ शकते तर ती आपल्याकडे का सापडत नाही.. ? आपल्याकडे वारंवार वन्य प्राणी आणि मानव हा संघर्ष का उभा राहतो.. याला बऱ्याच अंशी माध्यमेही खूप जबाबदार आहेत. साधारणत: प्राण्यांशी निगडीत बातमीचे स्वरूप पहा.. ” मानववस्तीत बिबट्याचा थरार” , “कुत्र्याने माणसाचे लचके तोडले”, मानवी वस्तीत शिरलेला वाघ जेरबंद”, .. रानटी हत्तींचे सिंधुदुर्गात थैमान.. शेतपिकांची केली नासधूस.. आपण माणसे निसर्ग, पर्यावरण ही आपली वडिलोपार्जित संपत्ती समजतो.. पण त्याच निसर्गाचे आपणही काही देणे लागतो हे मात्र संपूर्णत: विसरून जातो. निसर्ग, प्राणी, पक्षी ही आपल्याला मिळालेली दैवी संपत्ती आहे. त्याचे जतन करण्याची जबाबदारीही आपलीच असते. निसर्गातील प्रत्येक घटक ज्याच्या त्याच्या परीने माणसांची मदत करत असतो.. माणसांच्या कामात महत्वाचा वाटा उचलत असतो.. दहा हजार वर्षांपूर्वी हत्तींच्या 11 जाती जगभरात होत्या. आजमितीस केवळ तीन जाती शिल्लक आहेत. जगात हत्तींची संख्या झपाट्याने कमी होत असून सध्याच्या गतीने त्यांची शिकार होत राहिल्यास 2025 नंतर भूतलावर हत्ती शिल्लक राहणार नाहीत.
हत्तीची गणना बुद्धिमान पाण्यात केली जाते. माणसांचे अनेक गुण हत्तींमध्ये आढळून येतात. हत्तींची स्मरणशक्ती तीक्ष्ण असून त्यांच्या मागील पिढ्यांमधील आठवणी अनुवांशिकतेने पुढील पिढीत परावर्तित होतात. गेल्या हजारो वर्षांपासून राजे-महाराजे हत्तींना आपल्या सैन्यात एक उच्च स्थान देत आलेले आहेत.चंदन तस्कर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकट्या वीरप्पनने दक्षिणेतील तब्बल 900 हत्ती मारून अपरिमित नुकसान केले होते. हत्तींच्या दोन पिल्लांमधील जन्माचे अंतर सहा वर्षे असून त्यांच्या मृत्यूने जैवसाखळीचे नुकसान होते. हत्तींना मारणाऱ्या आरोपींना देहदंडाची शिक्षा देणे, तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या धर्तीवर हत्तींसाठी स्वतंत्र अधिवास निर्माण करण्याबाबत सरकार दरबारी प्रयत्न सुरू आहेत.
हत्ती हा जैविक साखळीतील अविभाज्य घटक आहे. हत्तींच्या कळपाच्या चालण्याने जमिनीवरील गवतातील बहुतांश किडे वर येतात. पक्षी हत्तींच्या कळपाचा पाठलाग करत गवतातून बाहेर आलेल्या किड्यांवर त्यांची उपजीविका करतात. हत्तींचा कळप नदीवरून अंघोळ करून येताना त्यांच्या ओल्या पायांचे वजनदार ठसे मातीत उमटतात. ठशांमुळे तयार झालेल्या खड्ड्यात पाणी साचून त्याठिकाणी कीटक, फुलपाखरे जमा होतात. त्यांना खाण्यासाठी बेडूक आणि त्यांच्या मागावर साप तेथे येतात. सापांना फस्त करण्यासाठी गरुड, घार आदी पक्षी घिरट्या घालतात. दुष्काळात हत्तींना नाले, ओढे, नदी यांच्या पात्रांतील पाण्याच्या जागा कळतात. तेथे ते पायाने किंवा सोंडेने 1 मीटर पर्यंत जमीन उकरून पाणी मिळवितात. हे पाणी इतर प्राण्यांनाही उपलब्ध होते.
प्राचीन काळी जगभरात हत्तींच्या सुमारे 350 विविध प्रजाती होत्या, तथापि, जसजसा काळ पुढे जात आहे, तसतसे जवळजवळ सर्वच नाहीसे झाले आहेत. आज, 2 प्रजाती टिकून आहेत, त्यापैकी एक 3 इतर उपप्रजाती आहेत. हत्तींचे सध्या अस्तित्वात असलेले प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
आशियाई हत्ती
आशियाई हत्ती (Elephas maximus) त्या खंडातील मूळ आहे, आणि तो सुमात्रा, श्रीलंका, भारत, चीन आणि इंडोनेशियामध्ये आढळू शकतो. हे झाडेझुडपे आणि मोकळ्या जागेत राहतात जेथे सखल वनस्पतींचे प्राबल्य असते. त्याची उंची 2 ते 2,5 मीटर दरम्यान आहे आणि तिचे वजन 5.500 किलोग्रॅम आहे.
त्याच्या तीन उपजाती पुढीलप्रमाणे आहेत.
श्रीलंकन हत्ती
भारतीय हत्ती
सुमात्रन हत्ती
आफ्रिकन सवाना हत्ती
आफ्रिकन बुश हत्ती (लोक्सोडोंटा आफ्रिकाना) हा ग्रहावरील सर्वात मोठा भूमी सस्तन प्राणी म्हणून ओळखला जातो. त्याच्या शरीराची लांबी 7,5 मीटर, उंची 4 मीटरपेक्षा जास्त असू शकते आणि सरासरी, पुरुषांचे वजन 6 टन असू शकते. माद्या सामान्यतः काहीशा लहान असतात, ज्यांची उंची 3 मीटर पर्यंत असते आणि कमाल वजन 4,5 टन असते.
1989 पासून हस्तिदंताच्या व्यापारीकरणावर जगभरात बंदी घातली असूनही, या सामग्रीला अजूनही मोठी मागणी आहे, याचा अर्थ हत्तींची शिकार अजूनही चालू आहे. या आणि मानवी क्रियाकलापांमुळे उद्भवलेल्या इतर घटकांमुळे, आज अस्तित्वात असलेल्या हत्तींच्या प्रजाती नष्ट होण्याचा धोका आहे.हत्तींना नामशेष होण्याचा धोका आहे आणि हे वास्तव आहे की आपल्यापैकी प्रत्येकाने गांभीर्याने घेतले पाहिजे. ते असंख्य संस्कृतींमध्ये प्रमुख स्थान असलेले मोठे प्राणी आहेत, तथापि त्यांची वन्य लोकसंख्या चिंताजनक प्रमाणात कमी होत आहे. बेकायदेशीर शिकार हे हत्तींच्या लोकसंख्येसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे, कारण त्यांना त्यांच्या हस्तिदंती दात आणि मांसासाठी मारले जाते. यामध्ये त्यांच्या निवासस्थानाचे नुकसान आणि विखंडन जोडले गेले आहे, याचा अर्थ कळपांनी त्यांना जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अन्नाच्या शोधात अधिक दूरच्या ठिकाणी जाणे आवश्यक आहे. इतर घटक जे हत्तींसाठी धोक्याचे बनले आहेत ते म्हणजे त्यांचा पर्यटन किंवा मनोरंजनासाठी वापर केला जातो. यासाठी, हत्तींना वस्तू किंवा लोकांची वाहतूक करण्यासाठी किंवा सर्कस किंवा उत्सवांमध्ये करमणूक म्हणून वापरण्यासाठी सापळ्यात अडकवले जाते, ज्यामध्ये त्यांना फटके मारले जातात आणि सक्तीचे काम करण्यास सांगितले जाते. या व्यतिरिक्त, आफ्रिकन खंडातील बहुतेक भागांमध्ये असलेल्या सशस्त्र संघर्षांमुळे त्यांना खाण्यापिण्याचा तुटवडा भासतो.
त्यांना कसे वाचवायचे?
सध्या, हत्तींच्या या प्रजातींचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम प्रगत केले गेले आहेत, ज्यापैकी बहुतेक हे प्राणी जिथे आहेत त्या राष्ट्रांच्या संघटनांनी राबविले पाहिजेत. हत्तींना वाचवण्यासाठी केलेल्या विविध कृतींपैकी खालील गोष्टी स्पष्ट आहेत:
शिकार निर्मूलन करा
हत्तींच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने, आशिया आणि आफ्रिकेतील विविध देशांच्या सरकारी संस्थांनी शिकारीचे नियंत्रण आणि त्यानंतरच्या निर्मूलनासाठी ठराव मंजूर केले आहेत. यासाठी, त्यांनी शिकार करताना पकडलेल्या लोकांना दंड ते काही वर्षांच्या तुरुंगवासापर्यंत दंड लागू केला आहे. असे असूनही, हत्तींच्या संरक्षणाची हमी देणे अद्याप अवघड आहे, कारण ते प्रदेशाच्या विस्तृत भागात राहतात आणि अन्नाच्या शोधात शेकडो किलोमीटर फिरतात.
पर्यावरण फाउंडेशनकडून समर्थन
हत्तींच्या संरक्षणासाठी आज विविध संस्था आपले योगदान देतात; त्यापैकी केनियामध्ये स्थित सेव्ह द एलिफंट्स आणि थायलंडमधील सेव्ह द एलिफंट्स फाऊंडेशन आहेत. ज्या हत्तींचा गैरवापर झाला आहे किंवा गैरवर्तनाला बळी पडले आहेत त्यांच्या काळजीसाठी दोघेही जबाबदार आहेत, कारण ते लोकांसाठी पुनर्वसन आणि पर्यावरणीय पर्यटन योजनांचा समावेश करतात.
हस्तिदंती वस्तू खरेदी करणे टाळा
हस्तिदंत वस्तू न मिळवणे हा बेकायदेशीर शिकारीला विरोध करण्याचा एक मार्ग आहे, कारण हत्तींना सहसा फक्त त्यांच्या दांड्यासाठी मारले जाते.
पर्यावरण संवर्धनासाठी योगदान द्या
हत्तीसमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्याच्या अधिवासाची नासधूस करणे, कारण त्याचा थेट परिणाम त्याच्या लोकसंख्येच्या अस्तित्वावर होतो.म्हणून त्यांना जगण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे: या विषयावरील लोकांचे शिक्षण, सक्रिय संवर्धन प्रयत्न, शिकारींना तुरूंगात टाकणे आणि या प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण.
हत्तीविषयी काही माहित नसलेल्या गोष्टी.-
हत्तीच्या आवाजाने जंगलातील प्राणी दूर पळतात. हत्तीचा सर्वात जास्त वेळ खाण्यामध्ये जातो. त्यांना दीडशे किलो हून अधिक खाद्य दररोज लागते. हत्तींची गर्भवस्था 18 ते 22 महिन्यांचे असते.
हत्ती हा जगातील असा एकमेव प्राणी आहे, तो उड्या मारू शकत नाही. हत्तीच्या सोंडीत मुंगी घुसले तर त्याचा जीव तळमळतो त्यामुळे हत्ती चालताना, फुंकर मारत असतो असे म्हटले जाते.
प्राण्यांमध्ये हत्ती सर्वात शक्तिशाली प्राणी आहे. नवजात हत्तीच्या अंगावर विरळ, तपकिरी, काळे किंवा तांबूस तपकिरी केस असतात. वाढत्या वयाबरोबर केस हळूहळू कमी होतात.
हत्तींचे खायचे दात वेगळे, आणि दाखवायचे दात वेगळे असतात. त्याचा एक दात एका विटेएवढा मोठा असतो.हत्तीला अंतर्गत भागात चार दाढा आणि बाहेरून दोन सुळे असतात. माणसांप्रमाणेच हत्तींच्याही भावभावना असतात.
हत्ती हे शंभर वर्षाहून अधिक जगू शकतात एका मिनिटात दोन ते तीन वेळा श्वास घेतात पाण्याचा वासही हत्ती बर्याच दूर आवरून घेऊ शकतो तसेच त्यांची स्मरणशक्ती सुद्धा जास्त असते. एकांतात डुलणारा तसेच झुलणारा हत्ती हा आनंदी नसून तो हत्तींचा मानसिक आजार असतो.
हत्तीचे तळवे स्पंजसारखे मऊ असतात. त्यामुळे हत्ती चालताना त्याचा आवाज होत नाही. हत्ती दिवसाला साधारणता 20 किलोमीटर चालतो. तर 50-100 लीटर पाणी हत्तीला दिवसाला प्यायला लागते.
हत्तीला सहसा कुठला रोग होत नाही. परंतु संपर्कातून त्याला इतर पाळीव प्राण्यांचे किंवा मनुष्यांचे रोग होऊ शकतात. वन्य हत्तीची जखम व आजार लवकर बरे होतात. त्याच्या त्वचेत सोंड खुपसून रक्त शोषणाऱ्या जंगलातील हॉर्स फ्लाय माश्या, बारीक पिसवा व अन्य कीटक यांचा हत्तीला फार त्रास होतो. हा त्रास चुकविण्यासाठी तो सोंडेने माती अंगावर वरचेवर फवारतो.
बगळ्यासारखे पक्षी हे कीटक खाऊन त्याचा हा त्रास पुष्कळ कमी करतात. हत्ती पोटातील पाणी सोंडेनेकाढून ते अंगावर फवारूनही आपला त्रास कमी करतो, अशी योजना इतर कोणत्याही प्राण्यांत नाही. हत्तीचे अवयव इतर सस्तन प्राण्यांच्या अवयवांसारखे असले, तरी अधिक मोठे असतात.
हत्तीचे हृदय माणसाच्या हृदयाच्या पाचपट मोठे आणि पन्नासपटींहून अधिक जड असते. हत्ती सोंडेचा वापर हाताप्रमाणे करतो. वस्तू धरणे व पकडणे, सोंडेच्या टोकावरील झडपेसारख्या संरचनेमार्फत नाण्याएवढी लहान वस्तू उचलणे, 275 किलोपर्यंत वजनाचे ओंडके उचलून वाहून नेणे, तसेच इतर हत्तींशी संपर्क साधणे, पिलांना थोपटणे या कामांतही त्याला सोंडेची मदत होते.
दोन हत्ती परस्परांना शुभेच्छा देतात. शुभेच्छा देताना प्रत्येक हत्ती आपल्या सोंडेचे टोक दुसऱ्या हत्तीच्या मुखात ठेवतो. तरुण नर सोंडेद्वारे कुस्ती खेळून लुटुपुटूची लढाई करतात.

त्याचे आयुर्मान सुमारे 70 वर्षे आहे.
जेव्हा ते प्रखर उन्हात असतात तेव्हा ते स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्यांची त्वचा खूप चिखलाने झाकतात.
त्यांची झोप अल्प असते, कारण ते दिवसातून दोन ते चार तास झोपतात. त्यांचा बराचसा वेळ अन्नाच्या शोधात फिरण्यात जातो.
हत्ती हा एकमेव प्राणी आहे ज्याला 4 गुडघे आहेत.
फक्त त्याच्या खोडात सुमारे 100.000 विविध स्नायू ओळखले गेले आहेत.
त्यांच्या दैनंदिन सेवनात ते 250 किलोग्रॅमपेक्षा जास्त वापरू शकतात.
त्यांची सुमारे 300 किलोग्रॅम उचलण्याची आणि सुमारे 15 लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे.
त्याचा मेंदू प्राण्यांच्या राज्यात सर्वात मोठा मानला जातो.
त्यांचे कान वेगवेगळ्या कार्यांसाठी ओळखले जातात: शरीराचे तापमान नियंत्रित करणे, संभाव्य धोके टाळणे, मोठ्या अंतरावर आवाज ऐकणे इ.
ते उत्सर्जित होणाऱ्या आवाजाला “बॅरिटो” म्हणतात.
त्यांना उंदरांपेक्षा मुंग्या आणि मधमाश्यांची जास्त भीती वाटते.
एखाद्याला समान त्रास होत असताना ते तणावग्रस्त होऊ शकतात.
१) भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच मोठे मोठे सुळे असतात. मादीला सुळे नसतात. क्वचित एखाद्या नरालाही सुळे नसतात. सुळे नसलेल्या नराला ‘माखणा’ म्हणतात.
२) इतर जंगली जनावरांपेक्षा हत्तींना जास्त बुद्धी असते, त्यामुळे त्यांना शिकवून त्यांच्याकडून अनेक प्रकारची कामे करून घेता येतात.
३) हत्तीचा बुध्यांक( EQ ) चिम्पान्झीइतका उच्च असतो.
४) हत्ती त्याच्या कळपातील प्रत्येक सदस्याला ओळखू शकतो, एव्हढेच नाही तर आकार आणि गंधानुसार कमीतकमी ३० सदस्य तो लक्षात ठेवू शकतो.
५) हत्तीची स्मृती त्याच्या कळपापुरती किंवा त्याच्या अधिवासापुरती मर्यादित राहत नसून तो अशा व्यक्ती देखील स्मरणात ठेवतात ज्यांच्या सोबत त्यांचे भावनिक बंध तयार होतात. लहानपणी संपर्कात आलेल्या व्यक्ती देखील तो अनेक वर्षानंतर देखील ओळखू शकतो.
६) हत्तींनी दिलेले ध्वनिसंकेत हे वाऱ्यासोबत सर्व दिशांना जातात. निरीक्षणात असेही आढळले आहे की हत्तीची स्वतःची एक भाषा व व्याकरण असते. केवळ ध्वनीच्या माध्यमातून हत्ती आपल्या कळपाशी किंवा इतर प्राण्यांशी संपर्क साधू शकतो.
तो आपल्या दृष्टी, गंध, स्पर्श व ध्वनीज्ञानाचा उपयोग इतर हत्तींशी व प्राण्यांशी संपर्क साधण्यासाठी करतो. त्याला स्पंदनलहरी देखील चटकन जाणवतात, ज्यांचा उपयोग तो आपल्या संवाद व हालचालींसाठी करतो.
हत्तीची खासियत म्हणजे खर्ज स्वरातील व दिर्घ पल्ल्यावर साधलेला संवाद होय.
७) मानवामधे आढळणारा post traumatic stress disorder ( मानसिक ताण-तणाव ) हत्तींमध्येपण आढळतो. एखादा आघात किंवा दुःखद घटनेच्या आठवणींनी हत्ती देखील व्यथीत होतात. ते या घटनांमुळे येणाऱ्या तणावाला बळी पडू शकतात.
८) हत्तीची संवेदनशीलता त्याला अनेक प्रकारच्या संकटांवर उपाय शोधण्यास उपयोगी पडते.
९) हत्तीला अंकगणिताची देखील चांगली समज असते. तो वस्तूची संगती सुद्धा लक्षात ठेवू शकतो.
१०) हत्ती १२ प्रकारचे ध्वनी किंवा स्वर ओळखू शकतो. इतकेच नाही तर ऐकलेल्या निरनिराळ्या सुरावटी देखील तो वाद्यांच्या सहाय्याने पुन्हा निर्माण करू शकतो.
११) हत्ती हा मानवेतर सस्तन प्राण्यांमधील एकमेव सस्तन प्राणी आहे जो कळपातील मृत सदस्यांचे दफन करतो. एव्हढेच नाही तर तो वारंवार त्या दफनस्थळाला भेट देतो.
वैदिक काळापासून धार्मिक ग्रंथ व पुराणकथा यांत हत्तीचा उल्लेख आहे. हिंदू व बौद्ध धर्मांत हत्ती पवित्र मानतात. हिंदू धर्मातील प्रमुख देवता ‘गणपती ‘चे शीर्ष हत्तीच्या रूपातील आहे.
ऋग्वेदा मध्ये हत्तीसाठी हस्तिन् (हात असलेला) असा शब्द वापरला आहे.
हत्तींच्या अनेक जाती मानल्या जात असत. सर्वोत्तम हत्तीला कुमेरिया म्हणतात. मृग ही दुसरी जाती असून या दोन्हीमधील एका जातीचे नाव द्वासाला आहे. आसाममधील आहोत जातीच्या लोकांनी हत्तीपुथी या ग्रंथात मनुष्य व हत्ती यांच्या स्वभावांत तुलना करून जाती पाडल्या आहेत.


























































