वाढदिवसानिमित्त व्यावसायिकाने 23 कैद्यांचे दंड भरून केली सुटका

140

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तरप्रदेशमधील व्यावसायिक मोतीलाल यादव यांचा 73 वा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त त्यांनी तुरुंगातून 23 कैद्यांचे दंड भरून  सुटका केलीआहे.

मोतीलाल यादव यांचा 73 व्या वाढदिवस होता. एका वर्तमानपत्रात कैद्यांना भांडी वाटप करण्यात आली अशी बातमी आली होती. तुमच्या वाढदिवशी तुम्ही असे कार्य करा असे यादव यांच्या मुलाने सुचवले. तेव्हा यादव जिल्ह्याच्या तुरुंगात गेले आणि अधिकार्‍यांची भेट घेऊन आपली इच्छा सांगितली. अधिकार्‍यांनीही त्यांना सहकार्य केले. असे अनेक लोक होते जे छोट्या मोठ्या गुन्ह्यासाठी तुरुंगात होते.

सागर नावाचा कैदी तुरुंगात होती. 17 ऑगस्ट 2016रोजी त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. त्याची वागणूकही चांगली होती. परंतु त्याला 1 हजार 89 रुपये दंड भरणे गरजेचे होते. पैसे नसल्याने तो तुरुंगात होती. यादव यांनी त्याचे पैसे भरले आणि त्याची सुटका केली. अशा 23 कैद्यांचा 32 हजार 380 रुपयांचा दंड यादव यांनी भरला आणि त्यांची सुटका केली.

आपली प्रतिक्रिया द्या