
स्वामीराज प्रकाशन या संस्थेने ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांच्या ‘मराठीचा पाठ’ या कवितेकर आधारित अभिनव एकांकिका लेखन स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 21111, द्वितीय 11111 आणि तृतीय पारितोषिक 7777 रुपये आणि सन्मान चिन्ह असे आहे.
ही स्पर्धा सर्वासाठी खुली असून प्रवेश शुल्क नाही. एकांकिका 1 जून 2023 पर्यंत PDF स्वरूपात [email protected] यावर पाठवायची आहे. नाटय़ क्षेत्रातील नामकंत लेखक , दिग्दर्शक या स्पर्धेचे परीक्षण करतील. अशोक नायगावकर यांची कविता मिळविण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी स्पर्धा संयोजक ज्येष्ठ कला दिग्दर्शक सुनील देवळेकर यांच्याशी 8879813905 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. या अभिनव स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि ती यशस्वी करावी असे आवाहन स्वामीराज प्रकाशन या संस्थेने केले आहे.


























































