भीमानदी पात्रातून एक जण वाहून गेला; शोध सुरु

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी ।  नगर

राज्यात पावसात जोर वाढु लागला असतानाच गोदावरी व भीमा नदी पात्रातून मोठ्या पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. भीमानदी पात्रातुन रमेश जाधव नावाची व्यक्ती वाहुन गेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गोदवरी व भीमानदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु आहे. गोदावरी नदीपात्रातुन सायंकाळी सहा वाजता २९६९४ क्यु सेस तर भिमा नदी पात्रातून ६५४५८ विसर्ग सुरु आहे. त्यामुळे प्रशासनाने आजु बाजुच्या गावांना पुराचा धोका असल्याचे यापुर्वीच सांगितले असून तात्काळ नदी काठच्या गावांचे स्थलांतर करण्याचे आदेशही दिले आहे. काल पासूनच दोन्ही नदीपात्रातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे पुलावरुनसुध्दा पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातुन भिमानदी पात्रातुन रमेश जाधव नावाची व्यक्ती वाहुन गेली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली असुन त्याचा शोध सध्या सुरु आहे.