मोटरसायकल-ट्रक अपघातात एक ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावर चरवेली येथे मालवाहू ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक बसून अपघात झाला. याअपघाताता मोटरसायकलवरील तरूणांचा मृत्यू झाला.

लांजा तालुक्यांतील कुंभारवाडीतील साईराज कोळंबेकर आणि त्याचा मित्र श्रीकांत सत्यवान कुंभार हे दोघे मोटरसायलक क्र.एम.एच.०८ टि ७४३५ वरून लांजा पूनस ते रत्नागिरी असे निघालेले असताना समोरून येणाऱ्या भरधाव मालवाहू ट्रक क्र.के.ए.२८ सी ८९३७ ने मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात श्रीकांत सत्यवान कुंभार यांचा मृत्यू झाला. मोटरसायकल ट्रक खाली जाऊन ट्रकही पलटी झाला. साईराज कोळंबेकर हा जखमी झाला आहे. साईराज आणि श्रीकांत हे दोघे शेजारी रहात होते.