मेळघाटात आणखी एका वाघाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अमरावती

मेळघाटमध्ये कोहा गावाजवळील तलावात बुडून वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दोन महिन्यातील ही दुसरी घटना असून, राज्यात वर्षभरात आठ वाघांचा मृत्यू झाला आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत कोहा अतिसंरक्षित वनात टी-32 वाघाचा मृतदेह तलावात आढळून आला.

मृत वाघाच्या पायावर व शरीरावर काही ठिकाणी जखमा देखील होत्या. मृत वाघाचे वय सात वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात वाघाचा मृत्यू पाण्यात बुडून झाला असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी विषप्रयोग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फेब्रुवारीमध्ये धारगड जंगलात एका वाघाचा मृत्यू झाला होता. ऑक्टोबर 2018मध्ये चिखलदरा नजीक मोथा जंगलात एका वाघाचा मृत्यू झाला होता. यामुळे वाघांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.